लस सर्वांना मिळेल, गर्दी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST2021-04-14T04:19:47+5:302021-04-14T04:19:47+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या वतीने कोरोनावरील लस देण्याचे काम सुरू आहे. सर्वांना लस देण्यात येणार आहे; परंतु नागिरकांनी आराेग्य केंद्रावर ...

Everyone will get the vaccine, don't rush | लस सर्वांना मिळेल, गर्दी करू नका

लस सर्वांना मिळेल, गर्दी करू नका

अहमदनगर : महापालिकेच्या वतीने कोरोनावरील लस देण्याचे काम सुरू आहे. सर्वांना लस देण्यात येणार आहे; परंतु नागिरकांनी आराेग्य केंद्रावर गर्दी न करता शिस्तीचे पालन करून लस घ्यावी, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मंगळवारी येथे केले.

महापौर वाकळे यांनी सावेडी येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी आयुक्त शंकर गोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे आढळून आले. त्यामुळे वाकळे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.

उपस्थित असलेल्या नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. लस सर्वांना मिळणार आहे. शासनाकडून जस जशी लस उपलब्ध होईल, तशी ती नागरिकांना दिली जाणार आहे, असे वाकळे म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनादेखील लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रावर गर्दी करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन वाकळे यांनी यावेळी केले.

..

सूचना फोटो आहे.

Web Title: Everyone will get the vaccine, don't rush