प्रत्यक्ष भेटीबरोबरच सोशल मीडियावरही भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:49+5:302021-01-14T04:17:49+5:30

पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अखेरच्या टप्प्यात उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा ...

Emphasis on social media as well as face-to-face visits | प्रत्यक्ष भेटीबरोबरच सोशल मीडियावरही भर

प्रत्यक्ष भेटीबरोबरच सोशल मीडियावरही भर

पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अखेरच्या टप्प्यात उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. पळवे परिसरात कडूस, घाणेगाव, गटेवाडी, म्हसणे, सुलतानपूर पळवे बुद्रूक, जातेगाव, बाबुर्डी, रांजणगाव, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण आदी गावांमध्ये निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. गावातील एक एक मतदान आपले कसे होईल यासाठी उमेदवार कंबर कसत आहेत. काहींनी बाहेरगावी असलेल्या मतदारांशी संपर्क करून त्यांचे मतदान कसे वळवता येईल, याचे प्रयत्न करत आहेत. याचबरोबर ग्रामीण भागातही मोबाईल ॲपद्वारे ग्रामपंचायत निवडणूक उमेदवाराच्या प्रचारासाठी व्हिडीओ तयार केले जात आहेत. यामुळे येथील तरुणांना निवडणुकीचे फोटो, व्हिडीओ तयार करण्याचा रोजगारही मिळाला आहे.

फाेटो : १३ पळवे

Web Title: Emphasis on social media as well as face-to-face visits