घरकुल योजनेतील प्रशासकीय अडचणी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:32+5:302021-08-18T04:27:32+5:30

अहदनगर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी येणाऱ्या प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करा, असा आदेश खासदार डॉ. सुजय ...

Eliminate administrative problems in Gharkul scheme | घरकुल योजनेतील प्रशासकीय अडचणी दूर करा

घरकुल योजनेतील प्रशासकीय अडचणी दूर करा

अहदनगर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी येणाऱ्या प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करा, असा आदेश खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे, तसेच योजनेच्या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत विखे बोलत होते. बैठकीला महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक निखिल वारे, धनंजय जाधव, सचिन जाधव, आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, यशवंत डांगे, नगररचनाचे साहाय्य संचालक राम चारठाणकर, प्रकल्प प्रमुख आर.जी. मेहत्रे आदी उपस्थित होते. शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील केडगाव, संजयनगर, नालेगाव येथे गृहप्रकल्प प्रस्तावित आहे; परंतु ही योजना रखडली आहे. नागरिकांना हक्काचा निवारा मिळेल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. आपल्या अधिकारात असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्या अडचणींसंदर्भात शासन दरबारी प्रयत्न करायचा आहे त्याबाबत आपण पाठपुरावा करू, असे विखे म्हणाले.

....

सूचना : फोटो १७ महापालिका नावाने आहे.

Web Title: Eliminate administrative problems in Gharkul scheme