शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात १५६ सहकारी संस्थांच्या निवडणूका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सहकारी संस्थांच्या सहा टप्प्यात निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : सहकारी संस्थांच्या सहा टप्प्यात निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५६ सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसल्यानंतर जिल्हयात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी तीनवेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या १ हजार ६८६ इतकी आहे. यापैकी न्यायालयाच्या आदेशाने १७ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. उर्वरित ज्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, त्या सहकारी संस्थांची पहिल्या टप्प्यात निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सहकारी प्राधिकरणाने दिला आहे. त्यानुसार येथील उपजिल्हा निबंधक कार्यालयाकडून मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या १५६ सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर थांबल्या होत्या, त्या टप्प्यापासून सुरू निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक असलेल्या बहुतांश सहकारी संस्थांच्या मदारयाद्या अंतिम करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील मागीलवर्षी मुदत संपलेल्या सहकारी संस्था १ हजार ८६ इतक्यात आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे मागीलवर्षी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका चालू वर्षात होत आहेत. त्यात चालू वर्षात मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या १ हजार २९१ इतकी आहे. त्यामुळे दोन्ही वर्षांत मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका एकाच वर्षात होणार आहेत. जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपाठोपाठ सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे.

...

जिल्हा बँकेसाठी दिग्विजय आहेर निवडणूक अधिकारी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठीची अंतिम मतदारयादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर साधारण १५ दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. जिल्हा बँकेची मतदारयादी जाहाीर होऊन आठ दिवस उलटून गेले असून, पुढील आठवड्यात बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरीस संचालक मंडळांच्या निवडणूकीसाठी मतदान होण्यची शक्यता आहे. बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत असून, या निवडणूकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तूळाचे लक्ष लागून आहे.