वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:20+5:302021-02-05T06:35:20+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. पुन्हा एकदा कारखाना सभासदांनी ...

Election of Vriddheshwar factory unopposed | वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. पुन्हा एकदा कारखाना सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे व आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला. राजळे यांनी संचालकपदी अनेक नवी चेहऱ्यांना संधी दिली.

नवीन चेहऱ्यांमध्ये साहेबराव गोपीनाथ सातपुते, यशवंतराव गवळी, बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे, काकासाहेब शिंदे, कुशीनाथ बर्डे यांचा समावेश आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक असे : कासारपिंपळगाव गट- आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धवराव रघुनाथ वाघ. चितळी गट- अनिल शिवाजी फलके, साहेबराव गोपीनाथ सातपुते, सुभाष बाबुराव ताठे.

कोरडगाव गट- श्रीकांत साहेबराव मिसाळ, बाबासाहेब रंगनाथ किलबिले. पाथर्डी गट- रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत. मिरी गट- शरद हरिभाऊ अकोलकर, यशवंतराव निवृत्ती गवळी. टाकळीमानूर गट- बाळासाहेब भगवान गोल्हार, शेषराव सूर्यभान ढाकणे.

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगरउत्पादक संस्था सभासद मतदारसंघ- राहुल आप्पासाहेब राजळे. अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी- काकासाहेब मुरलीधर शिंदे. महिला प्रतिनिधी- सिंधुबाई महादेव जायभाये, मोनिका राजीव राजळे.

इतर मागासवर्ग- कुशीनाथ खंडू बर्डे. भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी- कोंडीराम रामजी नरोटे.

कासारपिंपळगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीतही विरोधकांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने वृद्धेश्वरच्या बिनविरोध निवडप्रक्रियेने गती घेतली. अखेर वृद्धेश्वरचीही निवडणूक बिनविरोध झाली.

(जोड आहे)

Web Title: Election of Vriddheshwar factory unopposed