शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पैशांचा ‘अधिकृत’ महापूर

By admin | Updated: November 28, 2014 01:15 IST

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अक्षरश: पैशांचा महापूर वाहिला़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १३५ उमेदवारांनी

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात अक्षरश: पैशांचा महापूर वाहिला़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १३५ उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारावर तब्बल ७ कोटी ६३ लाख ९२ हजार रुपये खर्च केल्याचे जिल्हा निवडणूक शाखेच्या अहवालावरून उघड झाले आहे़ नेवासा मतदारसंघात सर्वाधिक ८३ लाख रुपयांचा चुराडा झाला असून,पाथर्डीत सर्वात कमी ३६ लाख ८८ हजार रुपये प्रचारावर खर्च झाले आहेत़जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी तब्बल १३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ आघाडी व युतीने ‘एकला चलो रे’ची हाक दिल्याने पहिल्यांदाच उमेदवारांची एवढी संख्या वाढली़ चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्याने दिग्गजांचा कस लागला़ जिल्ह्यातील साखर सम्राटांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती़ त्यामुळे निवडणुकीत पैशांचा महापूर येणार असल्याची अपेक्षा सर्वांनाच होती आणि घडलेही तसेच़ प्रस्थापितांनी राजकारणात बसविलेले गेल्या अनेक दिवसांचे बस्तान कायम ठेवण्यासाठी निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला़ खर्चासाठी हात मोकळा सोडूनही काहींच्या पदरी निराशाच आली़ तर काहींनी कमी खर्चात निवडणुकीत बाजी मारली़ जिल्ह्यातील काही मतदारसंघात मनी फॅक्टर चालला नाही़ निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब पाहिल्यास हे प्रकर्षाने जाणवते़ जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारावर मोठा खर्च झाला़ परंतु उमेदवारांनी प्रशासनाच्या चौकटीत बसेल, एवढाच खर्च केला असून, एकानेही खर्चाची २८ लाखांची लक्ष्मण रेषा ओलांडली नाही़ त्यामुळे विजयी व पराभूत उमेदवारांची निवडणुकीनंतरच्या कारवाईतून सुटका झाली आहे़ (प्रतिनिधी)