शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

कारेगाव सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

बाजार समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांचे संस्थेवर वर्चस्व आहे. संस्थेच्या १३ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ...

बाजार समितीचे माजी सभापती दीपक पटारे यांचे संस्थेवर वर्चस्व आहे. संस्थेच्या १३ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सत्ताधारी गटाच्या १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी पात्र उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे २५ जानेवारीला अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी बिनविरोध निवडणूक पार पडणार आहे.

दरम्यान, शेतकरी संघटनेचे पश्चिम विभागाचे प्रमुख बाळासाहेब पटारे, ठमाकांत साळवे, हरिभाऊ पटारे, कानिफनाथ चव्हाण, सोपानराव बोरूडे, संजय इंगळे, नानासाहेब बोरूडे, जयदीप पटारे, सुधीर भापकर यांनी पुणे येथील निवडणूक प्राधिकरण व सहायक निबंधक यांच्याकडे हरकत दाखल केली आहे. गोपनीयरित्या निवडणूक पार पाडण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीनंतर संस्थेचे एक हजारांहून अधिक सभासद मतदानासाठी पात्र आहेत. मात्र, असे असताना मागील वर्षाच्या सभासद यादीवरून हा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी केवळ ६७ सभासद पात्र ठरले आहेत. याचाच अर्थ मोजकेच सभासद संस्थेचे भविष्य ठरविणार का? असा आक्षेप बाळासाहेब पटारे यांनी हरकतीमध्ये नोंदविला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे पटारे यांनी सांगितले.

-----------

निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्याकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दाखल झालेल्या हरकतींवर आम्ही खुलासा केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया नियमांनुसारच घेण्यात आली आहे.

- विजयसिंह लकवाल, सहायक निबंधक,श्रीरामपूर

------------