अहमदनगरमध्ये दम मारो दम, सात जणांना रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 17:19 IST2023-03-30T17:19:16+5:302023-03-30T17:19:35+5:30
कोतवाली पोलिसांच्या पथकाने पार्लवर छापा टाकला असता तिथे सात जण हुक्का पित होते.

अहमदनगरमध्ये दम मारो दम, सात जणांना रंगेहाथ पकडले
अण्णा नवथर
अहमदनगर: नगर शहरातील कल्याण रोड भागात सुरू असलेल्या हुक्का पार्लवर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी सात जणांना हुक्का ओढताना रंगेहाथ पकडले. पोलिसांना पाहताच हुक्क ओढत बसलेले काहीजण पळून गेले असून, त्यांचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
शहरातील कल्याण रोड भागातील रेल्वेस्टेशन पटरी जवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण हुक्का ओढत आहेत, अशी माहिती गुप्ती बातमीदारामाफत पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. कोतवाली पोलिसांच्या पथकाने पार्लवर छापा टाकला असता तिथे सात जण हुक्का पित होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ओंकार संतोष शिंदे ( रा. साईराम सोसायटी), किरण अनिल शेळके ( रा. भावना रुषी सोसायटी, कल्याण रोड), रोहित राकेश दहिवाळ आदींचा समावेश आहे.