शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद पोलिसाचे पिस्तुल चोरीस

By admin | Updated: January 16, 2016 23:06 IST

अहमदनगर : कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय अंबादास माने यांच्याकडे असलेले एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे यांची पुण्यात चोरी झाली.

अहमदनगर : कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय अंबादास माने यांच्याकडे असलेले एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे यांची पुण्यात चोरी झाली. मुंबई येथील प्रयोगशाळेत पिस्तुलाची तपासणी करण्यासाठी जात असताना पुणे रेल्वेस्थानकावर हा प्रकार घडला. या चोरीप्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी दारुच्या नशेत असल्याची माहिती आहे. कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माने हे शुक्रवारी नगर येथून मुंबईकडे निघाले होते. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे याची मुंबईच्या कलिना येथील प्रयोगशाळेत तपासणी करायची होती. त्यासाठीच माने हे पिस्तुल घेवून मुंबईकडे निघाले होते. माने हे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वेस्थानकावर उतरले. त्यांच्या पिशवीतील पिस्तुल चोरीला गेल्याचे शनिवारी पहाटेच्या सुमारास लक्षात आले. या प्रकरणी पुणे येथील बंड गार्डन पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.पोलीस कर्मचारी माने यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या एका मित्रासमवेत मद्यप्राशन केले. मद्यप्राशन केल्यानंतर पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील गुडलक बेकरीसमोरील रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत असताना त्यांचा गावठी कट्टा आणि दोन काडतुसे अज्ञात इसमाने लंपास केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या ताब्यातील पिस्तुल चोरीला गेल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यात शनिवारी याच विषयाची दबक्या आवाजात चर्चा होती.(प्रतिनिधी)