शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संवर्धनासाठी डॉक्टर सरसावले

By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST

अहमदनगर : उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना रूग्णाला एक रोपटेही भेट देण्याचा उपक्रम सावेडी येथील नोबल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे.

अहमदनगर : उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी जाताना रूग्णाला एक रोपटेही भेट देण्याचा उपक्रम सावेडी येथील नोबल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आला आहे. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनीच या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. माणसाचे जीवन अधिक सुखमय आणि आरोग्यसंपन्न व्हायचे असेल तर किमान एक झाड जगविणे काळाची गरज असल्याचा संदेश यानिमित्ताने दिला आहे.नोबल हॉस्पिटलमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यानिमित्त डॉ. कांडेकर यांनी रुग्णांना घरी जाताना एक रोपटे भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या ‘वृक्ष माझा सखा’ या उपक्रमाबाबत डॉ. कांडेकर म्हणाले, औषधोपचारानंतर बरे होऊन घरी जाताना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. तसाच आनंद रुग्णांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून समाजाला द्यावा. एका झाडाची एका रुग्णाने जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. दिलेले रोप घराच्या अंगणात, कॉलनीत, रस्त्याच्या कडेला यापैकी कुठेही लावावे. मात्र ते रोपटे वाढविण्याची जबाबदारी रुग्णाने घेणे आवश्यक आहे. पुढच्या वेळी रुग्णाकडून रोपट्याची माहिती घेतली जाणार आहे. रोपटे लावण्याच्या या उपक्रमात हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी असतील. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कवडे म्हणाले, जिल्ह्यात ३३ टक्के वनीकरण आवश्यक असताना केवळ ८ टक्केच वनीकरण झाले आहे. झाडांची संख्या कमी आहे. त्यामुळे माणसाचे जीवन धोक्यात आले आहे. हे सर्व टाळायचे असेल तर झाडे लावण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.या कार्यक्रमास एल अ‍ॅण्ड टीचे अरविंद पारगावकर, डॉ. सुंदर गोरे, डॉ. प्रताप पटारे, डॉ. विजय पाटील, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. दिलीप पवार, राहुल हिरे, विनय पिंपरकर, डॉ.राकेश गांधी आदी उपस्थित होते. नोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय निकम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)