डॉ. मिलिंद अहिरे यांची विस्तार शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय सोसायटीच्या सहसचिवपदी नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:19 IST2021-05-24T04:19:52+5:302021-05-24T04:19:52+5:30

डॉ. आहिरे हे कृषिविस्तार व संज्ञापन विभागप्रमुख असून, त्यांच्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगावचा सहयोगी अधिष्ठाताचा अतिरिक्त पदभार ...

Dr. Appointment of Milind Ahire as Joint Secretary, International Society for Extension Education | डॉ. मिलिंद अहिरे यांची विस्तार शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय सोसायटीच्या सहसचिवपदी नेमणूक

डॉ. मिलिंद अहिरे यांची विस्तार शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय सोसायटीच्या सहसचिवपदी नेमणूक

डॉ. आहिरे हे कृषिविस्तार व संज्ञापन विभागप्रमुख असून, त्यांच्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगावचा सहयोगी अधिष्ठाताचा अतिरिक्त पदभार आहे. डॉ. अहिरे यांनी या अगोदर धुळे कृषी महाविद्यालयाचा सहयोगी अधिष्ठाताचा पदभार सक्षमपणे सांभाळला आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांनी २००५ साली जी. बी. पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून कृषिविस्तार या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. ते सध्या इंडियन सोसायटी ऑफ एक्स्टेन्शन एज्युकेशन नवी दिल्ली पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशनच्या सहसचिवपदी त्यांची नेमणूक असून, सोसायटी ऑफ कृषी विज्ञानच्या पश्चिम विभागाचे समन्वयक म्हणून ते काम बघत आहे. धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी चार वर्षं शेतकरीभिमुख विस्तार कार्य केले आहे. कृषी विद्यापीठाच्या तसेच राज्यस्तरीय विविध समित्यांवर त्यांची तज्ज्ञ सल्लागार आणि सदस्य म्हणून नेमणूक आहे. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

Web Title: Dr. Appointment of Milind Ahire as Joint Secretary, International Society for Extension Education