अनुदान नको, पण इमारत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:30+5:302020-12-25T04:17:30+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या वतीने संजयनगर येथे उभारलेले बेघर निवारा केंद्र विना आनुदान तत्वावर चालविण्यास देण्याची मागणी येथील स्नेहालय संस्थेने ...

Don’t grant, but give the building | अनुदान नको, पण इमारत द्या

अनुदान नको, पण इमारत द्या

अहमदनगर : महापालिकेच्या वतीने संजयनगर येथे उभारलेले बेघर निवारा केंद्र विना आनुदान तत्वावर चालविण्यास देण्याची मागणी येथील स्नेहालय संस्थेने महापौरांकडे केली आहे. हे केंद्र लोकसहभागातून चालविण्याची या संस्थेची तयारी आहे.

येथील स्नेहालय संस्थेेने महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, गेल्या ३२ वर्षंापासून समाजातील बेघर, निवारा नसलेल्या व्यक्ती, कुटुंब, झोपडपट्टीतील कुटुंब बालकामगार, वेश्या व्यावसाय करणार्या महिला, त्यांची मुले, बालमाता, बेवारस अर्भकांचा संभाळ, आशा वंचित घटकांचे पुनर्वसनाचे काम स्नेहालय संस्था करत आहे. तसेच कोरोनाच्या संकट काळातही संस्थेने प्रभावीपणे सेवा पुरविलेल्या आहेत. बेघरांना विना आनुदान तत्वावर सेवा पुरविण्यास संस्था सक्षम असून, महापालिकेची अर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे बेघर निवारा केंद्र स्नेहालय संस्था विना आनुदान तत्वावर चालविण्यास तयार आहे. ही संस्था स्वनधीसह लोकसभाभागातून बेघकरांना उत्तम सेवा पुरविल. त्यामुळे कोणतेही शुल्क न घेता बेघर निवारा केंद्राची इमारत महापालिकेेने स्नेहायल संस्थेस द्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Web Title: Don’t grant, but give the building