ढोकरीकर कुटुंबाकडून अर्धा एकर जमीन अत्यावश्यक सेवेसाठी दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:06+5:302021-08-18T04:27:06+5:30

कर्जत : शहरातील ढोकरीकर कुटुंबाने कर्जत-वालवड रस्त्यालगत असलेली अर्धा एकर जागा नगर पंचायतीला अग्निशमन केंद्रासाठी दान दिली आहे. नगर ...

Donation of half an acre of land from Dhokrikar family for essential services | ढोकरीकर कुटुंबाकडून अर्धा एकर जमीन अत्यावश्यक सेवेसाठी दान

ढोकरीकर कुटुंबाकडून अर्धा एकर जमीन अत्यावश्यक सेवेसाठी दान

कर्जत : शहरातील ढोकरीकर कुटुंबाने कर्जत-वालवड रस्त्यालगत असलेली अर्धा एकर जागा नगर पंचायतीला अग्निशमन केंद्रासाठी दान दिली आहे.

नगर पंचायतीकडे अ‍ॅम्ब्युलन्स आहे. मात्र, हे वाहन उभे कोठे करायचे, हा प्रश्न होता. त्यामुळे वाहन एकीकडे तर चालक दुसरीकडे, कर्मचारी तिसरीकडे राहत होते. यामुळे कोठे काही दुर्घटना घडली तर या यंत्रणेची जमवाजमव करण्यातच वेळ जात होता. असे प्रसंग अनेक वेळा घडले. यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे कार्यालय, कर्मचारी निवास व्यवस्था यासाठी निधी मंजूर झाला. त्यानंतर मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी जागेची समस्या आमदार पवार यांच्याकडे बोलून दाखवली. त्यानंतर पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद ढोकरीकर यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर तात्काळ प्रसाद ढोकरीकर, प्रवीण ढोकरीकर, त्यांची बहीण स्मिता काटे यांनी त्यांच्या मालकीची अर्धा एकर जागा नगर पंचायतीला मोफत दिली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत या जागेचा उतारा मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सुनील शेलार, नगरसेवक बापूसाहेब नेटके आदी उपस्थित होते.

---

१७ कर्जत ढोकरीकर

नगर पंचायतीच्या अग्निशमन केंद्रासाठी ढोकरीकर कुटुंबाने अर्धा एकर जागेचा सातबारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगर पंचायतीकडे सुपुर्द केला.

Web Title: Donation of half an acre of land from Dhokrikar family for essential services