शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची वाहने अडवू नका

By admin | Updated: May 22, 2016 00:17 IST

शिर्डी : साईदर्शनाला आलेल्या भाविकांना महामार्ग पोलिसांच्या जाचातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

शिर्डी : साईदर्शनाला आलेल्या भाविकांना महामार्ग पोलिसांच्या जाचातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ यापुढे भाविकांचीच नव्हे तर अन्य चारचाकी वाहनेही सूचना असल्याशिवाय अडवण्यात येऊ नये, अशा सक्त सूचना महामार्ग पोलीसचे मंडल निरीक्षक राजेंद्र मायने यांनी बाभळेश्वर पोलीस केंद्राला शनिवारी दिल्या़टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाविकाला त्रास होता कामा नये, अपघातात मदत करणे, प्रवाशांना मार्गदर्शन करणे अशी कामे करून पोलिसांची प्रतिमा उजाळण्याच्या सूचनाही मायने यांनी दिल्या आहेत़ त्यामुळे आता पोलीस निर्मळ पिंप्री किंवा अस्तगाव येथे वाहने अडवण्यासाठी थांबणार नाहीत, तसेच स्थानिकांसह कोणत्याही चारचाकी वाहनांवर विनाकारण कारवाया करणार नाहीत़ मोठी वाहने रस्त्याच्या खाली पार्कींग करण्याची सोय असणारा नवीन पॉईंट कारवाईसाठी निर्माण करण्यात येणार आहे़ एवढेच नव्हे तर नाशिककडून येणाऱ्या मार्गावर असलेल्या पोलिसांनाही अशाच प्रकारच्या सूचना दिल्या आहेत़महामार्ग व अन्य पोलिसांकडून होणारा भाविकांना त्रास, पोलिसांच्या कार्यशैलीमुळे गेल्या आठवड्यातील अपघातासह वारंवार होणारे अपघात यावर ‘लोकमत’ ने गेले सहा दिवस सातत्याने लिखाण केले़ त्याची दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही घेतली़ तर भाविकांसाठी जीवघेण्या व पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या या घटनांची पोलीस अधीक्षक डॉ़ सौरभ त्रिपाठी यांनी गंभीर दखल घेतली़ त्यांनी याबाबत झाडाझडतीही घेतली़