जिल्हा बँकेचा अध्यक्ष महाविकासआघाडीचाच-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 15:03 IST2021-02-11T15:02:47+5:302021-02-11T15:03:31+5:30

अहमदनगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद मिळाला आहे काही ठिकाणी मात्र अजून निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय होईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

District Bank Chairman Mahavikasaghadichacha-Balasaheb Thorat | जिल्हा बँकेचा अध्यक्ष महाविकासआघाडीचाच-बाळासाहेब थोरात

जिल्हा बँकेचा अध्यक्ष महाविकासआघाडीचाच-बाळासाहेब थोरात

अहमदनगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद मिळाला आहे काही ठिकाणी मात्र अजून निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय होईल. 

 

जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्व एकत्र येत आहोत सर्व ठिकाणी राजकारण करत नसते संस्था टिकल्या पाहिजेत यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. श्री कोपरगाव तालुक्यातील काळेगाव फुले श्रीरामपूर व श्रीगोंदा या तालुक्यांचा मेळ घातला आहे त्याला मोठा त्याला प्रतिसाद दिलेला आहे, असे थोरात म्हणाले
...
विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच
विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे या पदावर काँग्रेसच्या नेत्याची नियुक्ती होईल विधान सभेचे अधिवेशन येत्या 1 मार्चपासून सुरू होईल त्यापूर्वी महा विकास आघाडीतील सर्व नेते बसून निर्णय घेतला जाईल .

Web Title: District Bank Chairman Mahavikasaghadichacha-Balasaheb Thorat