विक्रम अडसूळ यांच्या माय स्टॅम्प पोस्ट तिकिटाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:28+5:302021-09-07T04:27:28+5:30

कर्जत : येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांच्या माय स्टॅम्प तिकिटाचे वितरण शिक्षक दिनानिमित्त करण्यात आले. यावेळी ...

Distribution of Vikram Adsul's My Stamp Post Ticket | विक्रम अडसूळ यांच्या माय स्टॅम्प पोस्ट तिकिटाचे वितरण

विक्रम अडसूळ यांच्या माय स्टॅम्प पोस्ट तिकिटाचे वितरण

कर्जत : येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांच्या माय स्टॅम्प तिकिटाचे वितरण शिक्षक दिनानिमित्त करण्यात आले.

यावेळी कर्जत उपविभागीय

डाक निरीक्षक अमित देशमुख, शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, प्राचार्य डी. डी. सूर्यवंशी, एटीएमचे राज्य सहसंयोजक ज्ञानदेव नवसरे, नारायण मंगलारम, शिक्षक नेते राजेंद्र निमसे, टपाल संघटनेचे नेते संतोष यादव उपस्थित होते.

विक्रम अडसूळ हे कर्जत तालुक्यातील बंडगरवस्ती या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते देशातील उपक्रमशील, प्रयोगशील शिक्षक असून शिक्षण क्षेत्रात ते वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करतात. याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना २०१८ साली राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व आयसीटी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले आहे. विक्रम अडसूळ यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. कोरोना काळातही मुलांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी वेगवेगळे प्रयोग केले आहेत.

Web Title: Distribution of Vikram Adsul's My Stamp Post Ticket