जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्रांचे कामकाज सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:31+5:302021-02-05T06:28:31+5:30
अहमदनगर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २७ जानेवारीपासून पुढील १५ दिवस कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिव्यांगासाठी अपंग मंडळाचे कामकाज ...

जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्रांचे कामकाज सुरू
अहमदनगर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २७ जानेवारीपासून पुढील १५ दिवस कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिव्यांगासाठी अपंग मंडळाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. यासाठी रुग्णालयामध्ये दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेतच नोंदणी करावी. या वेळेत नोंदणी केलेल्या दिव्यांगांचीच अपंग मंडळाकडून तपासणी करून प्रमाणपत्रे वाटप करण्यात येतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी पत्रकात म्हटले आहे.
संबंधित दिव्यांगाने प्रमाणपत्रासाठी येताना त्यांचे स्वतःचे नाव असणारे मूळ रेशनकार्ड, दोन पासपोर्ट साइजचे फोटो व आधार कार्डची छायांकित प्रत सोबत आणावी. अपंग प्रमाणपत्राबाबतचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. कोरोना कालावधीत नोंदणी बंद ठेवल्याची माहिती डॉ. पोखरणा यांनी दिली होती. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत नोंदणी कामकाज सुरू करण्याचे आणि संबंधितांना प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची तातडीने अंंमलबजावणी करण्यात येत असल्याते पोखरणा यांनी पत्रकात म्हटले आहे.