शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप गांधी यांना केंद्रीय मंत्रीपदाचे वेध!

By admin | Updated: March 20, 2024 11:00 IST

अहमदनगर : दोन लाख मतांच्या फरकाने निवडून येत विजयाची हॅटट्रिक साधणारे खासदार दिलीप गांधी यांना आता केंद्रीय मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.

अहमदनगर : दोन लाख मतांच्या फरकाने निवडून येत विजयाची हॅटट्रिक साधणारे खासदार दिलीप गांधी यांना आता केंद्रीय मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. विजयी मिरवणूक घेऊन विश्रांती घेत असतानाच त्यांना दिल्लीचे बोलावणे आले आणि शनिवारी पहाटेच ते दिल्लीकडे रवाना झाले. सायंकाळी ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी झाले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून दोन लाख नऊ हजारांचे मताधिक्क्य घेत गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव राजळे यांचा दारुण पराभव केला. विजयाचे प्रमाणपत्र मिळविल्यानंतर गांधी यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, अरुण जेटली, श्याम जाजू यांना विजयाची दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यांनी गांधी यांना लगेच दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. गांधी तिसर्‍यांदा नगरचे खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. मोदी यांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला चार कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाचपैकी एक पद गांधी यांना मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळेच गांधी यांना दिल्लीला निमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे. खासदार गांधी यांच्याशी शनिवारी सायंकाळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत होते, त्यामुळे त्यांचाशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी) खासदार दिलीप गांधी हे १९९९ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ते जहाज बांधणी मंत्रालयात राज्यमंत्री होते. वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात खासदार बाळासाहेब विखे यांच्यानंतर मंत्रीपद मिळालेले गांधी हे दुसरे खासदार होते. माजी खासदार बबनराव ढाकणे हे ही केंद्रीय मंत्री मंडळात ऊर्जा राज्यमंत्री होते. मात्र त्यांनी बीड मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. कोपरगाव मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार अण्णासाहेब शिंदे हे १९६२ ते १९७७ अशी पंधरा वर्षे केंद्रीय कृषी राज्यमंत्री व कृषी उपमंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये होते. १९९९ च्या सरकारनंतर जिल्ह्याच्या वाट्याला अद्यापपर्यंत एकही केंद्रीय मंत्रीपद लाभले नाही.