आपातापा (जि. अकोला) : शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांच्या अनुषंगाने तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनांमध्ये आखतवाडा ग्राम समाविष्ट असल्याने ग्रामवासीयांना पर्यावरणाकरिता वृक्षाचे महत्व, वृक्ष लागवड, ग्रामविकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन विशेष ग्रामसभेद्वारे करण्यात आले. यापुढे आधी शौचालय, नंतरच घरकुल, अशी योजना संपूर्ण जिल्ह्यामध्ये अमंलात आणणार असल्याचे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. अकोला पं. स. अंतर्गत येत असलेल्या गट ग्रा. पं. आखतवाडा येथे २१ जूनला विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणुन घेतांना ह्यआमचा गाव आमचा विकासह्ण या संकल्पनेनुसार विकासात्मक दिशा देण्यात आली. घरा-घरांसमोर वृक्ष लागवड व संगोपन, संवर्धन यावर विशेष भर देण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण गावात फेरी मारीत गावात शौचालय आहेत अथवा नाहीत याची खातरजमा करीत, जि. प. शाळा, अंगणवाडी, वाचनालय आदींची पाहणीसुध्दा केली.
उपमहापौरपद अडीच वर्षासाठी
By admin | Updated: June 23, 2016 01:26 IST
अहमदनगर: महानगरपालिकेच्या उपमहापौर निवडणुकीदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडी या पक्षादेशानुसार घडल्या आहेत.
उपमहापौरपद अडीच वर्षासाठी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}