आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात 'वंचित' आक्रमक! शेवगावात धडकला भव्य मोर्चा; गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:39 IST2026-04-29T14:33:43+5:302026-04-29T14:39:42+5:30

हा मोर्चा सकाळी ११ वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौकातून सुरू झाला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी हातात फलक घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

'Deprived' aggressive against MLA Sanjay Gaikwad! Massive march in Shevgaon; Demand to register a case | आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात 'वंचित' आक्रमक! शेवगावात धडकला भव्य मोर्चा; गुन्हा दाखल करण्याची मागणी

आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात 'वंचित' आक्रमक! शेवगावात धडकला भव्य मोर्चा; गुन्हा दाखल करण्याची मागणी

आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.

हा मोर्चा सकाळी ११ वाजता शेवगाव शहरातील आंबेडकर चौकातून सुरू झाला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी हातात फलक घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा पुढे शेवगाव पोलीस ठाण्यावर धडकला.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करून, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title : विधायक संजय गायकवाड के ख़िलाफ़ 'वंचित' का प्रदर्शन; प्राथमिकी दर्ज करने की मांग

Web Summary : शेवगाँव में विधायक संजय गायकवाड के विवादास्पद बयान के ख़िलाफ़ वंचित बहुजन आघाडी का प्रदर्शन। कार्यकर्ताओं ने मार्च किया, महान नेताओं के कथित अपमान के लिए तत्काल मामला दर्ज करने की माँग की। पुलिस ने ज्ञापन स्वीकार किया और सुरक्षा तैनात की।

Web Title : Vanchit Protests Against MLA Sanjay Gaikwad; Demand FIR Filed

Web Summary : Vanchit Bahujan Aghadi protested against MLA Sanjay Gaikwad's controversial statement in Shevgaon. Activists marched, demanding immediate filing of a case for allegedly insulting great leaders. Police accepted the memorandum and deployed security.