शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांचे ५ कोटी बँक खात्यावर जमा

By admin | Updated: October 22, 2015 21:15 IST

खुर्ची जप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कवडे दोन दिवस दालानाकडे फिरकले नाहीत. तिसर्‍या दिवशी बुधवारी कवडे यांना बसण्यासाठी दुसरी खुर्ची ठेवण्यात आली.

 खुर्ची जप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कवडे दोन दिवस दालानाकडे फिरकले नाहीत. तिसर्‍या दिवशी बुधवारी कवडे यांना बसण्यासाठी दुसरी खुर्ची ठेवण्यात आली. दुपारनंतर कवडे यांनी दुसर्‍या खुर्चीवर बसून कामाला सुरुवात केली. न्यायालयाने जप्त केलेली खुर्ची कोपरगाव न्यायालयात जमा करण्यात आली असून, कवडे यांना दुसरी खुर्ची देण्यात आली आहे. अहमदनगर : जिल्हाधिकार्‍यांची खुर्ची जप्त केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आली. शिर्डी विमानतळासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव पाच कोटी रुपयांचा मोबदला उपविभागीय कार्यालयाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावर बुधवारी जमा करण्यात आला असून, कोपरगाव न्यायालयामार्फत ते शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या न्यायालयीन लढाईला अखेर यश आले. कोपरगाव न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची खुर्ची जप्त करण्यात आली. न्यायाधीश व्हि. एल. पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. सलग दुसर्‍या दिवशी मंगळवारीही संगणक जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांच्या खुर्चीसह संगणक जप्तीच्या कारवाईने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. न्यायालयाच्या या दणक्याने मंत्रालयातील यंत्रणाही हालली. काकडी येथील ४९ शेतकर्‍यांना वाढीव दराने ७ कोटी ४९ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून धूळखात पडून होता. त्यावरील धूळ झटकली. मंत्रालयातून चक्रे फिरली आणि काकडी येथील शेतकर्‍यांना अखेर न्याय मिळाला. शेतकर्‍यांच्या ७ कोटी ४९ लाखांपैकी ५ कोटी रुपये शिर्डी उपविभागीय कार्यालयाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास सायंकाळी प्राप्त झाले. उपविभागीय कार्यालयाकडून ही रक्कम कोपरगाव न्यायालयात जमा केली जाणार आहे. (पान १0 वर) शेतकर्‍यांचे'लोकमत'ला धन्यवाद■ गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळासाठी काकडी येथील शेतकर्‍यांचा वाढीव मोबदल्यासाठी लढा सुरू आहे. या लढय़ात 'लोकमत' ने साथ दिली. त्यामुळेच या लढय़ाला यश आल्याचे सांगून काकडी येथील चंद्रभान गुंजाळ यांच्यासह शेतकर्‍यांनी 'लोकमत'ला धन्यवाद दिले.