शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

बुरूडगावात डेंग्यूने मुलीचा मृत्यू

By admin | Updated: June 24, 2016 01:24 IST

अहमदनगर: नगर शहरालगत असलेल्या बुरूडगाव येथे साक्षी पाचारणे या नववीत शिकणाऱ्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला. नगर शहरातील भोसले आखाडा, माळीवाडा,

अकोला: अमरावती विभागातील पाच जिल्हय़ांला शासनाने पीक विम्याच्या नुकसानभरपाईपोटी ६८६ कोटी रू पये मंजूर केले असून, जिल्ह्यात खरीप हंगाम सन २0१५-१६ मधील विविध पिकांसाठी अकोला जिल्हय़ाला १३४ कोटी २८ लाख ५९ हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून बँकेमार्फत थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.आकोट तालुक्यामध्ये कापूस, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग. तेल्हारा तालुक्यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी व तीळ. बाळापूर तालुक्यामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी व तीळ. पातूर तालुक्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तीळ. अकोला तालुक्यामध्ये ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग व तीळ. बाश्रीटाकळी तालुक्यामध्ये तूर, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तीळ, तर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सोयाबीन व मूग या पिकांना शासनाकडून नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. सदर नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून बँकेमार्फत थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल. पीक विम्यापोटी आकोट २४ कोटी २९ लाख २६ हजार ८१0, तेल्हारा १४ कोटी ८६ लाख ३३ हजार ५0७, बाळापूर तालुका १७ कोटी १४ लाख ७७ हजार ४0३, पातूर तालुका १७ कोटी ९0 लाख ६५ हजार ५४0, अकोला तालुका ३४ कोटी ५३ लाख ८0 हजार ९९९, बाश्रीटाकळी तालुका ८ कोटी ८५ लाख ६५ हजार ४३१, तर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी ६ कोटी ६८ लाख ९ हजार ८४२ रुपये विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तालुकानिहाय मंजूर पीक विमा रक्कम एकूण १३४ कोटी २८ लाख ५९ हजार ५३२ रुपये आहे. ही रक्कम लवकरच प्राप्त होणार असून, संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांकडून पीक विमा रकमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात होती. दरम्यान, शासनामार्फत पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना आधार मिळणार आहे.