खुनाच्या चौकशीची मागणी
By Admin | Updated: October 7, 2014 23:42 IST2014-10-07T23:40:25+5:302014-10-07T23:42:34+5:30
अहमदनगर: नेवासा तालुक्यात वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या पाच जणांच्या खुनाच्या चौकशीची मागणी छावा मराठा युवा संघटनेचे नगर जिल्हा दक्षिण प्रमुख शिवाजी सांगळे यांनी केली आहे.

खुनाच्या चौकशीची मागणी
अहमदनगर: नेवासा तालुक्यात वेगवेगळ््या ठिकाणी झालेल्या पाच जणांच्या खुनाच्या चौकशीची मागणी छावा मराठा युवा संघटनेचे नगर जिल्हा दक्षिण प्रमुख शिवाजी सांगळे यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीवर कार्यवाही करीत असल्याचे पत्र सीबीआय पुण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस.पी. सिंग यांनी सांगळे यांना पाठविले आहे. नेवासा तालुक्यात विजय बाबुराव वैरागर, सूरज साहेबराव थोरात यांच्यासह सोनईतील तीन दलित युवकांचा खून झाला होता. या प्रकरणात मूळ आरोपींना न पकडता दुसऱ्याच आरोपींना हजर करण्यात आल्याचा आरोप सांगळे यांनी पत्रात केला आहे. (प्रतिनिधी)