शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

महासभेच्या तीन जागांवरून वाद

By admin | Updated: July 20, 2016 00:24 IST

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ३ सदस्य महासभेने नियुक्त करण्याचा शिवसेनेने घाट घातला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान दिले आहे.

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ३ सदस्य महासभेने नियुक्त करण्याचा शिवसेनेने घाट घातला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान दिले आहे. महासभेतून ३ सदस्य निवडण्याबाबतचा आक्षेप नोंदवून घ्यावा. तसेच मनपाची खास सभा होण्यापूर्वी प्रभारी आयुक्तांनी पक्षीय संख्याबळ निश्चित करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिले आहेत.महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौर सुरेखा कदम यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता खास सभा बोलविली आहे. या सभेत संख्याबळाच्या निश्चितीवरून घोळ होण्याची शक्यता आहे. नव्या संख्याबळ निश्चितीमध्ये राष्ट्रवादी आघाडीचा एक सदस्य कमी झाला आहे, तर शिवसेनेचा एक सदस्य वाढला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र कवडे यांनी संख्याबळाबाबत नगरसचिवांशी चर्चा करण्याचे सूचविले होते.स्थायी समितीमधील राष्ट्रवादीची एक जागा कमी झाल्याने गटनेते संपत बारस्कर यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावेळी बारस्कर यांच्यावतीने अ‍ॅड. नितीन गवारे यांनी खंडपीठासमोर बाजू मांडली.महासभेतून ३ सदस्य नियुक्त करण्यास राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. राष्ट्रीय पक्ष असताना महासभेतून सदस्यांची नियुक्ती करू नये, अशी मागणीच याचिकेत करण्यात आली आहे. महासभेऐवजी राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शिवसेनेच्या कोट्यातून एक सदस्य नियुक्त करावा. महासभेतून नियुक्ती करण्याबाबतचा आक्षेप प्रभारी आयुक्तांनी नोंदवून घ्यावा. त्यानंतर संख्याबळ निश्चित करावे आणि सभा सुरू करावी, असे आदेशात म्हटले आहे.दरम्यान काँग्रेसच्या गटनेत्या सुवर्णा कोतकर आणि राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांची नावे पाकिटात द्यावीत, असे पत्र नगरसचिवांनी दिल्याचा दावा पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. कोतकर यांना पत्र दिले, मात्र बारस्कर यांना पत्रच मिळाले नसल्याची चर्चा आहे. सदस्य निवडण्याच्या घोळाबाबत आणि कोणते सदस्य स्थायीमध्ये पाठवायचे, याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षाच्या बैठका मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. सदस्य पदासाठी तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.(प्रतिनिधी)संख्याबळ निश्चितीबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक हे नगरसचिव मिलिंद वैद्य यांच्याशी संपर्क साधत होते. मात्र वैद्य यांचा मोबाईल ‘स्वीच आॅफ’ होता. त्यामुळे शिवसेनेने नगरसचिवांना गायब केल्याचा विरोधी नगरसेवकांचा आरोप होता. मात्र आमच्याच नगरसचिवांना आम्ही कशाला गायब करू, असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने केला आहे. दरम्यान महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सध्या जिल्हाधिकारी यांच्याकडे होता, मात्र जिल्हाधिकारी विदेश दौऱ्यावर जात असल्याने कवडे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्याकडे पदभार सोपविला आहे. त्यामुळे नगरसेवकांचा वाद आता वालगुडे यांच्यासोबत चांगलाच रंगणार आहे.