शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती कामाला खो

By admin | Updated: July 28, 2014 00:51 IST

अहमदनगर : गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषदेत दलित वस्ती सुधार योजनेचा आराखडा मंजुरीचा विषय गाजत असताना जिल्ह्यात सात वर्षांपासून एक हजार २२ कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे

अहमदनगर : गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषदेत दलित वस्ती सुधार योजनेचा आराखडा मंजुरीचा विषय गाजत असताना जिल्ह्यात सात वर्षांपासून एक हजार २२ कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. ही कामे ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अपूर्ण राहिली असून मुदत संपलेल्या या कामांना अंतिम निधी कसा द्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.समाजकल्याण विभागाच्या १५ दिवसापूर्वीच्या मासिक बैठकीत समितीच्या सदस्यांनी दलित वस्ती सुधार योजनेच्या ४५ कोटींच्या आराखड्याला स्थगिती दिली होती. २०१२-१३ पासून या योजनेसाठी राज्य सरकार पाच वर्षाचा आराखडा तयार करून त्यास मंजुरी देत आहे. गावपातळीवर ग्रामसभेच्या मान्यतेने आणि ग्रामसेवक- सरपंच यांच्या संयुक्त सहीने योजनेतून निधीसाठी आराखडा तयार करण्यात येता. हा आराखडा गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जि़ प़ समाजकल्याण विभागापर्यंत पाठविण्यात येतो. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी समाजकल्याण उपायुक्त यांच्याकडे पाठविण्यात येतो. या योजनेत जिल्ह्यात ज्या गावात दलित वस्तीत कोणतीच विकास कामे झालेली नाहीत. त्या ठिकाणी प्राधान्याने विकास कामे करण्याचे सरकारचे निकष आहेत. यासाठी टच आणि अनटच असे वर्गीकरण करून आराखड्यातील कामे निश्चित करण्यात येतात.जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पूर्वी या योजनेत मंजूर निधी तीन टप्प्यात ग्रामपंचायतींकडे वर्ग करत होता. मात्र, २०१२-१३ पासून त्यात बदल करण्यात आला. आता एकूण मंजूर निधीपैकी ९० टक्के रक्कम ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात येत आहे. यामुळे कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असल्याचे समाजकल्याण विभागाचे म्हणणे आहे. कामे अपूर्ण राहण्याचे प्रमाण अलीकडच्या दोन वर्षात अधिक आहे़ तसे असताना या ठिकाणी नव्याने निधी दिला आहे का? याची खातरजमा या निमित्ताने होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)समाजकल्याण विभाग ग्रामपंचायतींकडून ग्रामसभेच्या मान्यतेने आलेला आराखडा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने मंजूर करतो. त्यानंतर संबंधित गावाला निधी वर्ग करण्यात येतो. निधी वर्ग झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीने काम वर्षभरात पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे. अपूर्ण राहणाऱ्या कामांना ग्रामपंचायत जबाबदार आहे.-प्रदीप भोगले, समाजकल्याण अधिकारीतालुकानिहाय अपूर्ण कामेअकोले ३०, संगमनेर ८८ , कोपरगाव ४६, श्रीरामपूर ९२, राहाता ५४, राहुरी ६८, नेवासा ५१, शेवगाव १०६, पाथर्डी ७९, जामखेड ४७, कर्जत ८६, श्रीगोंदा ९५, पारनेर १०५, नगर ७५ यांचा समावेश आहे. दोन वर्षात सर्वाधिक कामे अपूर्णग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात २००७-०८ पासून दलित वस्ती सुधार योजनेची कामे अपूर्ण राहिलेली आहेत. यात पहिल्या वर्षी ६१९ पैकी २५, २००८-०९ मध्ये ५२३ पैकी २१, २००९-१० मध्ये पैकी ६०२ पैकी ३३, २०१०-११ मध्ये ६८९ पैकी ४९, २०१२-१३ मध्ये ७९८ पैकी २१४ आणि २०१३-१४ मध्ये ६५६ पैकी सर्वच कामे अपूर्ण राहिलेली आहे.