खरीप हंगामातही कृषी विभागाची पीक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST2021-07-13T04:06:28+5:302021-07-13T04:06:28+5:30

तिसगाव : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाचे कृषी विभागाच्या वतीने या वर्षी खरीप, रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना राबविण्यात ...

Crop competition of agriculture department even during kharif season | खरीप हंगामातही कृषी विभागाची पीक स्पर्धा

खरीप हंगामातही कृषी विभागाची पीक स्पर्धा

तिसगाव : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाचे कृषी विभागाच्या वतीने या वर्षी खरीप, रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी दिली. खरीप हंगाम पीक स्पर्धेत मूग, उडीद पिकांसाठी ३१ जुलै व बाजरी, भुईमूग, तूर, सोयाबीन, सूर्यफूल, पिकांसाठी ३१ ऑगस्ट अखेर विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही भोर यांनी केले आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकरी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत असतात. अशा क्रियाशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. गुणवान विजेत्या उत्पादकांचा गौरव करणे. त्याचे मनोबल उंचावणे, अशा उद्देशातून तालुका पातळीवर कृषी विभाग हा उपक्रम राबवित आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व तीनशे रुपयांचे चलन भरण्यासाठी मंडळ कृषी कार्यालयांशी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Crop competition of agriculture department even during kharif season