शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी तालुक्यातील पोळा सणावर अतिवृष्टीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

पाथर्डी : तालुक्यातील यंदाच्या पोळा सणावर अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे. अचानक आलेल्या पुरात अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधन ...

पाथर्डी : तालुक्यातील यंदाच्या पोळा सणावर अतिवृष्टीमुळे मोठे संकट आले आहे. अचानक आलेल्या पुरात अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधन मृत्युमुखी पडले आहे.

तालुक्यातील बहुतांश भाग कायम दुष्काळाच्या छायेत असतो. परंतु, यंदा मात्र जूनपासून लांबणीवर पडलेला पाऊस ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणावर बरसला. रात्रीच्या काळोखात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे पशुधन मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले. तालुक्यात आजअखेर अतिवृष्टीमुळे गाय-५, बैल ३, म्हशी ४, वासरू १, शेळ्या ९० असे एकूण १०३ शेतकऱ्यांचे पशुधन मृत झाल्याची सरकारदप्तरी नोंद आहे. याशिवाय हजारो कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.

समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी-नाले खळाळून वाहत असले, तरीही पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे शेतीकामात मदत करणारे बैल, गाय तसेच इतर पशुधन संकटात सापडल्याने पोळा सणावर दुःखाचे सावट आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सण साजरा करण्यावर निरुत्साह आहे.

-----

गायी, म्हशी गेल्या वाहून...

कोरडगाव येथील नानी नदीला ३१ ऑगस्टला पहाटे आलेल्या पुरामध्ये सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या गायी, म्हशी, बैल असे पशुधन वाहून गेले. घरात साठविलेले धान्य, संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेती, शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असून पशुधनाच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, पशुधन नाहीसे झाल्याने त्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली. यामुळे पोळा सण साजरा करणार नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळाल्यास शेतीकामासाठी नवीन बैलजोडी विकत घेऊन पुन्हा जोमाने शेती करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

----

अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या संपूर्ण जनावरांचे शवविच्छेदन केले आहे. योग्य तो अहवाल शासनाकडे पाठविला आहे.

डॉ. जगदीश पालवे,

पशुवैद्यकीय अधिकारी

----

०५ पाथर्डी नुकसान

कोरडगाव येथील शेतकरी सुभाष देशमुख यांचा पुरामुळे रिकामा झालेला गोठा.