शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना न्यायालयाची नोटीस

By admin | Updated: October 22, 2015 21:19 IST

न्यायालयाने आदेश देऊनही श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याने न्यायालयात तपास अहवाल सादर न केल्याने श्रीरामपूरचे कनिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी

 

श्रीरामपूर : न्यायालयाने आदेश देऊनही श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याने न्यायालयात तपास अहवाल सादर न केल्याने श्रीरामपूरचे कनिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. व्ही. बुरांडे यांनी पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जगदीश तुकाराम थेटे यांनी श्रीरामपूर पीपल्स बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक उर्फ बस्तीराम हनुमंतदास उपाध्ये व इतरांविरूद्ध भादंवि कलम ४0६, ४0९, ४१८, ४२0, ४२४, ४६५ ते ४७१सह कलम ३४ नुसार अँड. हेमंत थोरात यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे.  त्यावर तत्कालीन न्यायदंडाधिकारी विलास गायकवाड यांनी ५ सप्टेंबर २0१२ रोजी गुन्ह्याचा तपास करुन अहवाल सादर करण्याचा आदेश श्रीरामपूर शहर पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्कालीन सहायक निरीक्षक मनोजकुमार राठोड यांच्याकडे तपास दिला. पण ३ वर्षात पोलिसांनी याबाबत कोणताही अहवाल दिला नाही. अखेर थेटे यांनी त्यांचे वकील थोरात यांच्यामार्फत हा सर्व प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्याची दखल घेत न्यायालयाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस काढून अहवाल का पाठविला नाही? याचे स्पष्टीकरण मागितले आहे. (प्रतिनिधी) ■ जगदीश तुकाराम थेटे यांनी कोर्टात दाखल केलेल्या खासगी फिर्यादीनुसार श्रीरामपूरमधील अशोक उपाध्ये] राधाकिसन थेटे, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगरपालिकेची स्थायी समिती यांनी संगनमताने फौजदारी गुन्ह्याचा कट करुन सनी टी अँड केक शॉप हे दुकान परस्पर हस्तांतरित केले.