संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST2021-08-13T04:24:48+5:302021-08-13T04:24:48+5:30

संगमनेर : कोरोनाचा संसर्ग संगमनेर तालुक्यात आटोक्यात आणणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरू लागले आहे. तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असून ...

Corona's havoc will not stop in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर थांबेना

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर थांबेना

संगमनेर : कोरोनाचा संसर्ग संगमनेर तालुक्यात आटोक्यात आणणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरू लागले आहे. तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असून गुरुवारी (दि. १२) तालुक्यातील १२३ जणांना कोरोनाची लागण झाली. १ ते १२ ऑगस्ट या १२ दिवसांच्या कालावधीत तालुक्यात कोरोनाचे १४२४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे प्रशासकीय आकडेवारीतून समोर येते आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढते आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील साकूर गावात जिल्हाधिकारी भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी भेट दिली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा परिषदेच्या साकूर गटात दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तेथे कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास सुरुवात झाल्याचे संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

----------------------

संगमनेर तालुक्यातील पठार भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. ठरावीक ठिकाणी रुग्ण आढळून येत असून तेथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नाही. रुग्णसंख्या वाढते आहे. पठार भागातून मोठ्या संख्येने मजूर पुणे जिल्ह्यात जातात. एकाच वाहनातून २५ ते ३० जण बसलेले असतात. अनेकांच्या तोंडाला मास्क लावलेले नसते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, संगमनेर उपविभाग

------------

तारीख रुग्णसंख्या

१ ऑगस्ट १२८

२ ऑगस्ट १२६

३ ऑगस्ट १४८

४ ऑगस्ट १५८

५ ऑगस्ट १२०

६ ऑगस्ट ७४

७ ऑगस्ट १०६

८ ऑगस्ट ११४

९ ऑगस्ट ७७

१० ऑगस्ट ९८

११ ऑगस्ट १२५

१२ ऑगस्ट १२३

--------------

एकूण : १४२४

Web Title: Corona's havoc will not stop in Sangamner taluka