आरोग्यसेवकांना कोरोना योद्धा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:26+5:302021-08-18T04:27:26+5:30

नवनागापूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.१५) नवनागापूर येथे कोरोना काळात उत्तम आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ...

Corona Warrior Award to health workers | आरोग्यसेवकांना कोरोना योद्धा पुरस्कार

आरोग्यसेवकांना कोरोना योद्धा पुरस्कार

नवनागापूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.१५) नवनागापूर येथे कोरोना काळात उत्तम आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, लॅब कर्मचाऱ्यांचा सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असल्यामुळे कोरोना काळात आरोग्यसेवा पुरविताना ग्रामपंचायतची मोठी कसरत झाली. नवनागापूरमध्ये एमआयडीसी असल्यामुळे तेथे परप्रांतीय कामगारांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव होण्यासाठी घरोघर तपासणी असो किंवा कोरोनाबाधितांना खासगी व शासकीय रुग्णालयात सुविधा मिळवून देण्यात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. त्यासाठी सर्वांनीच ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य केले. यात डॉ. अमित महांडुळे, डॉ. राकेश साळवे, डॉ. फियाज देशमुख, डॉ. महेश यादव, डॉ. रवींद्र पगारे, डॉ. शिवनाथ पारखे, डॉ. अभिजित जगताप, डॉ. आयुब इनामदार, डॉ. संजीव गडगे, डॉ. अनिकेत भंडारी, आरोग्य सेविका तारा ठाणगे, तसेच कोविड काळात ग्रामपंचायत माध्यमातून दर आठवड्याला अँटिजन व आरटीपीसीआर टेस्ट मोफत घेणारे लॅब असिस्टंट गोरख शेवाळे, सुनील गडगे, चांगदेव भोसले यांनी मदत केली. आशा सेविका व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कोविड काळात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची थर्मामीटरद्वारे ताप तपासणे व सर्व्हे करणाऱ्या आशा सुपरवायझर वैशाली गायकवाड व त्यांच्या सहकारी, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सुमन सप्रे व त्यांच्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, गोकुळा श्रीराम व त्याच्या सर्व सहकाऱ्यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश तापडिया व फ्रान्सिस पवार यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमास उपसरपंच संगीता सप्रे, सदस्य सागर सप्रे, महेश कांडेकर, गोरख गव्हाणे, अर्जुन सोनवणे, सत्यभामा डोंगरे, हेमा चव्हाण, संगीता भापकर, रंजना दांगट, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ, मंडळ अधिकारी दिलीप जायभाय उपस्थित होते.

...............

१७ नवनागापूर

नवनागापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य सेविका तारा ठाणगे यांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान करताना सरपंच डॉ. बबनराव डोंगरे. समवेत डावीकडून सागर सप्रे, संगीता सप्रे, संजय मिसाळ, अर्जुन सोनवणे.

Web Title: Corona Warrior Award to health workers