कोरोना तपासणी अहवाल येताहेत पाच दिवसांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:31+5:302021-03-26T04:20:31+5:30

कोपरगाव : शहरासह तालुक्यातील कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील स्त्राव घेऊन आरटीपीसीआर तपासणीसाठीचे नमुने नगर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जात ...

Corona inspection reports are coming in five days | कोरोना तपासणी अहवाल येताहेत पाच दिवसांनी

कोरोना तपासणी अहवाल येताहेत पाच दिवसांनी

कोपरगाव : शहरासह तालुक्यातील कोरोना संशयित व्यक्तींच्या घशातील स्त्राव घेऊन आरटीपीसीआर तपासणीसाठीचे नमुने नगर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. याचा तपासणी अहवाल चार ते पाच दिवसांच्या अंतराने येत असल्याने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागत आहे. गुरुवारअखेर ४२२ व्यक्तींचे तपासणी अहवाल नगर येथे प्रलंबित आहेत.

कोपरगाव तालुक्यात व शहरात मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची मोठी रुग्णवाढ सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने संशयित व्यक्तीच्या तपासण्यादेखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये १०० पेक्षा जास्त व्यक्तींचे नमुने घेत रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासण्या केल्या जात आहेत. तर उर्वरित व्यक्तींच्या घशातून स्त्राव घेत नगर येथे आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुने पाठविले जात आहे.

नगर येथील तपासणी अहवाल मोबाइलवर देण्याची सुविधा उपलब्ध आहे. हा अहवाल येईपर्यंत स्थानिक आरोग्य प्रशासनाच्यावतीने त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, या तपासणीचा अहवाल चार ते पाच दिवसांनंतर येत आहे. दरम्यानच्या काळात आपण पॉझिटिव्ह आहोत की, निगेटिव्ह या चिंतेत तणाव सहन करावा लागत आहे.

................

कोपरगावातील एका व्यक्तीने रविवारी (दि.२१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास कोपरगावातील शासकीय आरोग्य यंत्रणेकडे त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी दिला होता. त्यावर ते बाधित असल्याचा गुरुवारी (दि.२५) सकाळी ७.४१ वाजता त्यांच्या मोबाइलवर संदेश प्राप्त झाला. त्यांचा अहवाल येण्याच्या दोन दिवसअगोदर त्यांना त्रास होऊन लागण्याने त्यांनी खासगी रुग्णालयात छातीची तपासणी (एचआरसीटी ) केली. त्यात त्यांचा स्कोअर ११ इतका आला. जो की शून्यावर असल्यास प्रकृती स्थिर समजली जाते. अहवाल उशिरा येत असल्याने रुग्णांची फजिती होत आहे. त्यामुळे शासनाने अशा पद्धतीच्या तपासणीची तालुका पातळीवर व्यवस्था करावी, अशी भावना संबंधित व्यक्तीने व्यक्त केली आहे.

...............

कोपरगावात दररोज शंभरपेक्षा जास्त व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे तपासणी केली जाते. तर १०० ते १२५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नगर येथे तपासणीसाठी पाठविले जात आहे. त्याचा अहवाल साधारण चार दिवसांनी येत आहे. या दरम्यान ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाते. ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना घरीच थांबण्यास सांगितले जाते.

- डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव

...........

मेसेज भरवतोय धडकी...

नगर येथे शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्त्रावाच्या तपासणी अहवालाचे चार ते पाच दिवसांनंतर मेसेज मोबाइलवर रात्री-अपरात्री, भल्या पहाटे अशा वेळेत पडायला सुरुवात होते. मात्र, यात जर बाधित असल्याचा मेसेज आल्यास अशा व्यक्तींना धडकीच भरते.क

Web Title: Corona inspection reports are coming in five days