शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत कॉँग्रेसचा सवतासुभा

By admin | Updated: December 17, 2015 23:42 IST

अहमदनगर: अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस स्वबळावर लढणार असून तसा आदेश प्रदेश कॉँग्रेसने दिला असल्याची माहिती सत्यजित तांबे व दीप चव्हाण यांनी येथे दिली.

अहमदनगर: अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस स्वबळावर लढणार असून तसा आदेश प्रदेश कॉँग्रेसने दिला असल्याची माहिती सत्यजित तांबे व दीप चव्हाण यांनी येथे दिली. कॉँग्रेसच्या या सवतासुभामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे. युतीतही ताणाताणी सुरू आहे. अजिंक्य बोरकर व अनिता भोसले हे दोन नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे १० जानेवारीला प्रभागाची पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २२ डिसेंबर आहे. या दोन्ही प्रभागाची पोटनिवडणूक स्वतंत्र लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी रेटा लावला होता. शिवाय निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पक्षाने या दोन्ही जागा पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश कॉँग्रेसनेही तसे आदेश दिले असल्याचे तांबे यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत आघाडी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र तांबे यांनी पक्षाची भूमिका जाहीर करून दोन्ही जागा कॉँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. जून २०१६ मध्ये महापौर पदाची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने या दोन प्रभागातील पोटनिवडणुकीला महत्त्व आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवारी अंतिम केली जाईल. कॉँग्रेसला पोषक असे वातावरण असून त्याचा फायदा या पोटनिवडणुकीत होणार असल्याचे तांबे, चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी) गर्जे, चव्हाण यांनी घेतले अर्ज कॉँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर होताच दीप चव्हाण यांचा मुलगा जयेश याने प्रभाग १५ साठी प्रशांत गर्जे यांनी प्रभाग ११ मधील उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. या दोघांना कॉँग्रेसची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. प्रभाग ११ साठी रमेश आजबे, प्रशांत गर्जे आणि १५ साठी जयेश दीप चव्हाण, विणा विजय वडांगळे, मंगल बाबुराव बोर्डे, भारती भोसले व किरण उनवणे यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले.