शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस तटस्थ की नव्या आघाडीसोबत?

By admin | Updated: June 19, 2016 23:13 IST

अहमदनगर : काँग्रेस पक्ष जातीयवादी पक्षासोबत आघाडी करणार नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केल्याने रविवारी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला

अहमदनगर : काँग्रेस पक्ष जातीयवादी पक्षासोबत आघाडी करणार नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केल्याने रविवारी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नव्या आघाडीसोबत जाणार की तटस्थ राहणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे मनसेच्या चारही नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यामार्फत दिले आहेत. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक रविवारी पुन्हा एकदा वेगळ््याच वळणावर येऊन ठेपली आहे.महापौरपदासाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता मतदान होणार आहे. शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी आघाडी करून हिरावून घेतल्याची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगलाच दाहरा बसला आहे. भाजपाचा एक गट शिवसेनेसोबत तर, दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत आहे. त्यामुळे महापौर शिवसेनेचा होणार की भाजपाचा याबाबत सध्यातरी संभ्रम आहे. भाजपाचा नवा गटनेता म्हणून सुवेंद्र गांधी यांची निवड करण्यात आली. तसा प्रस्ताव त्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल केला. मात्र महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एक महिन्याच्या आतच गट नोंदणी करता येत असल्याने गांधी गटनेते होऊ शकत नाहीत, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे भाजपाचे गटनेते दत्ता कावरे यांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या सुरेखा कदम आणि दत्ता कावरे यांना मतदान करावे, असे आदेशात म्हटले आहे. हा व्हीप कावरे यांनी रविवारी बजावला आहे. विखे पाटील यांचा दे धक्काभाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसशी घरोबा करून शहर विकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे महापौरपदाच्या उमेदवार नंदा मनेष साठे आणि उपमहापौरपदाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र रविवारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी जातीयवादी पक्षासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीबाबत नगरसेवकांनी काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय प्रदेश कमिटी घेणार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे विखे पाटील यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. विखे पाटील आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याचेही समजते. त्यामुळे महापौर निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहणार की नव्या आघाडीसोबत जाणार हे मंगळवारीच स्पष्ट होणार आहे.मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करावे, असा आदेश मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळ नांदगावकर यांच्यामार्फत दिला आहे. शिवसेनेत गेलेले मात्र तांत्रिकदृष्ट्या मनसेत असलेल्या किशोर डागवाले यांच्यासह चारही नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार सुरेखा कदम आणि भाजपाचे उपमहापौरपदाचे उमेदवार दत्ता कावरे यांना मतदान करावे, असे आदेश नांदगावकर यांनी दिले आहेत. तसे अधिकृत पत्र सोमवारी प्राप्त होईल.-सचिन डफळ, जिल्हा संघटक, मनसेकावरे यांनी बजावला व्हीपभाजपाच्या सर्व नऊ उमेदवारांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार सुरेखा कदम आणि उपमहापौरपदाचे उमेदवार दत्ता कावरे यांना मतदान करावे, असा पक्षादेश भाजपाचे गटनेते दत्ता कावरे यांनी बजावला आहे. याबाबतचे कावरे यांचे पत्र प्रसिद्धीमाध्यमांना पाठविले आहे. दरम्यान शनिवारी सुवेंद्र गांधी यांनी आपणच गटनेते झाल्याचे सांगून तसा व्हीप प्रसिद्ध केला होता.राष्ट्रवादीने नगरसेवकांच्या घरावर डकविला व्हीपमहापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेस-अपक्ष नगरसेवकांच्या शहर विकास आघाडीने आपल्या नगरसेवकांना पक्षादेश दिला आहे. आदेशाच्या प्रती राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांच्या घरावर डकविल्या आहेत. महापौरपदासाठी नंदा मनेष साठे व उपमहापौरपदासाठी श्रीपाद छिंदम हेच महानगर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनाच मतदान करावे, असे पक्षादेशात म्हटले आहे. आघाडीचे गटनेते समद खान यांच्या नावाने पक्षादेश बजावण्यात आला आहे. या पक्षादेशानुसार आघाडीतील सर्वांनी भाजपाला मतदान करणे बंधन कारक करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस-अपक्ष नगरसेवकांच्या शहर विकास आघाडीत २१ नगरसेवक आहेत. मात्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे, कलावती शेळके, सुनीता भिंगारदिवे हे तिघे बाहेर पडून शिवसेनेच्या तंबुत गेले आहेत. ते तिघेही नगरसेवक सहलीवर असल्याने त्यांच्या घरावर व्हीप डकविण्यात आला आहे.