शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

वीजपंपांची थकबाकी भरल्यास शेतकऱ्यांना सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST

राहुरी (जि. अहमदनगर) : राज्यात वीज बिलांची ४५ हजार ७१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात वीजपंपांची १५ हजार ३२५ ...

राहुरी (जि. अहमदनगर) : राज्यात वीज बिलांची ४५ हजार ७१० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात वीजपंपांची १५ हजार ३२५ कोटी रुपये आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरल्यास त्यावर शेतकऱ्यांना व्याज व दंड आकारणी यात सवलत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ग्रामपंचायतींनी शासकीय जमीन महाविरतणला उपलब्ध करून दिल्यास त्यांनाही दरवर्षी महावितरणकडून हक्काचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल, असेही पवार म्हणाले.

राहुरीत सहा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे होते. पवार म्हणाले, कृषी वीज बिल वसुलीसाठीच्या या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. नगर जिल्ह्यात ४ हजार ९९८ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. जिल्ह्यात वसूल होणाऱ्या रकमेपैकी ६६ टक्के निधी वीजनिर्मितीच्या, वीज वितरणाच्या जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध केला जाईल. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत जिराईत जमीन शेतकऱ्यांनी महावितरणला उपलब्ध करून दिल्यास एकरी ३० हजार रुपये महावितरणकडून दिले जातील. शासकीय जमिनी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या तर दरवर्षी त्यांनाही उत्पन्नाचा एक निश्चित स्रोत उपलब्ध होईल. वांबोरी चारीच्या सुधारित दुसऱ्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पवार यांनी दिले. यावेळी आ. लहू कानडे, आशुतोष काळे, संग्राम जगताप, माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगराध्यक्ष अनिता पोपळघट, अनुराधा आदिक, सुरेश वाबळे, निर्मलाताई मालपाणी, धनराज गाडे, डॉ. उषाताई तनपुरे, सोनाली तनपुरे, सभापती बेबीताई सोडनर आदी उपस्थित होते.

...................

बसस्थानकासाठी तरतूद करणार

राहुरी, ताहराबाद, आरडगाव, गणेगाव, बाभूळगाव या सहा ठिकाणी १९ अश्वशक्तीचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होत असून, या सहा महिन्यांत ते पूर्ण होतील, असे सांगत तनपुरे यांनी राहुरी ग्रामीण रुग्णालय, राहुरी बसस्थानक, निळवंडे कालव्याच्या प्रश्नांकडे मंत्री तनपुरे यांनी पवारांचे लक्ष वेधले. त्यावर पवार यांनी राहुरी बसस्थानकासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले.

.............

यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का

वांबोरी (ता. राहुरी) येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात विनामास्क आलेल्या लोकांना पाहून अजित पवार यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला. ते म्हणाले, कोरोनामुळे राज्यावर आर्थिक संकट आले आहे. कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका. अनेक जण नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. हे बघा हे पठ्ठे येथे विनामास्क फिरत आहेत. आता यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का, अशा शब्दांत पवारांनी आपला संताप व्यक्त केला.