शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षांची चिमुकली मृत्युमुखी, अहिल्यानगर-मनमाड महामार्ग रोखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:19 IST

Leopard Attack in Ahilyanagar: बिबट मारून टाका, मगच आम्ही इथून हलणार- ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहिल्यानगर): ऊसतोडणी मजुराच्या तीन वर्षीय चिमुरडीला बिबट्याने ठार केले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अहिल्यानगर-मनमाड मार्ग दोन तास रोखला. नंदिनी प्रेमदास चव्हाण (वय ३, रा. तळेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील टाकळी शिवारात नांदगावहून ऊसतोडणी मजूर आले आहेत. मृत मुलीचे वडील प्रेमदास चव्हाण हे कुटुंबासह देवीदास अशोक कोपरे यांच्या जुन्या घरामध्ये राहतात. बुधवारी सायंकाळी नंदिनी घराबाहेर खेळत असताना बिबट्याने कुटुंबीयांसमोरच तिला ओढत मक्याच्या शेतात नेले.

बिबट मारून टाका, मगच आम्ही इथून हलणार...

नागरिकांनी मृतदेह घेऊन अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील टाकळी फाटा (ता. कोपरगाव) येथे ठाण मांडले व ‘रास्ता रोको’ केला. वनविभाग बिबट्याला ठार मारत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी गावातील तरुणांनाच बिबट्याच्या शोधासाठी मक्याच्या पिकात पाठविले. बॅटऱ्या घेऊन १७ एकर मका पिकाचा परिसर तरुणांनी पिंजून काढला; पण बिबट्या सापडला नाही. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत.

बिबट्याची महिलेवर झडप

अवसरी (जि. पुणे)  : गोठ्यात  शिरलेल्या बिबट्याने झडप घातल्याने महिला जखमी झाली. ही घटना पारगाव (ता. आंबेगाव) चिचगाई वस्ती येथे नुकतीच घडली. अश्विनी शिवाजी ढोबळे (२९) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. अंगावरील स्वेटर फाटला मात्र त्या बचावल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Attack Kills 3-Year-Old; Road Blocked in Protest

Web Summary : A three-year-old girl was killed by a leopard in Kopargaon, leading to protests and a road blockade. Villagers demanded the leopard be killed before they would move. In a separate incident in Pune, a woman was injured in a leopard attack.
टॅग्स :leopardबिबट्याAhilyanagarअहिल्यानगरAnimalप्राणी