शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ 'ते' विधान मागे घ्यावे, विखे पाटलांचं ठाकरेंना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:39 IST

भाजपा नेते आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन

शिर्डी - साई जन्मस्थळाच्या मुद्द्याची दाहकता वाढत असून शिर्डीने रविवारपासून पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये पंचक्रोशीतील अनेक गावे सहभागी होत आहेत. या बंद काळात साईमंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून प्रसादालयही सुरू राहणार आहे. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़ नीलम गोऱ्हे यांनी साईबाबांचे दर्शन घेत बंद न पाळण्याचे आवाहन शिर्डीकरांना केले. तर, भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे. उद्धव ठाकरेंनी आपले विधान मागे घ्यावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. 

भाजपा नेते आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. जन्मस्थळाच्या वादावर बोलताना, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे. शिर्डीच्या जन्मस्थळाच्या वादावर अर्थकारण जोडलंय हे केलेले आरोप योग्य नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपले विधान मागे घ्यावे, असेही पाटील यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील सार्इंच्या जन्मस्थळासाठी १०० कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल, अशी घोषणा मागील आठवड्यात केली होती. त्याचे तीव्र पडसाद शिर्डी व भाविकांमध्ये उमटले आहेत. पाथरीला निधी देण्यास शिर्डीकरांची मुळीच हरकत नाही, मात्र साई जन्मस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण केली जाते याला शिर्डीकरांचा आक्षेप आहे़ जन्मस्थळाच्या वादामुळे बाबांच्या मूळ शिकवणुकीला व प्रतिमेलाच धक्का पोहचणार असल्याने शिर्डीकरांचा जन्मस्थानाच्या दाव्याला आक्षेप आहे.दरम्यान, रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून बेमुदत बंद संदर्भात पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनीही शिर्डीकरांबरोबर बैठक घेऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट केले़ या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, विजय कोते, शिवाजी गोंदकर, नितीन कोते आदी उपस्थित होते़ राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोऱ्हाळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर, निघोज निमगाव, वडझरी, पिंपळस, साकुरीसह अनेक गावे बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शनिवारी सायंकाळी ग्रामसभा होत असून तत्पूर्वी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे बैठक घेणार आहेत़

साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत कोणी कितीही दावे-प्रतिदावे केले तरी साईभक्तांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परिपक्व आहेत. त्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख का केला माहिती नाही़ ते जन्मस्थळाच्या नामोल्लेखाच्या वादावर नक्कीच तोडगा काढतील.

-दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री, गोवा

मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याचा विपर्यास झाला असावा. त्यामुळे शिर्डीकरांनी बंदची हाक देऊ नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संदर्भात शिर्डीकरांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत़ यासाठी त्यांना आपण विनंती केली आहे़

डॉ़ नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री