शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांचा जीआर आला जिल्हा परिषद: लोकसभेच्या निकालानंतर होणार प्रक्रिया

By admin | Updated: February 2, 2023 17:42 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वर्ग क आणि ड कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहेत. यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हास्तरावरील कर्मचार्‍यांच्या बदल्या १७ ते २३ मे दरम्यान होणार आहेत. तर तालुकास्तरावरील कर्मचार्‍यांच्या बदल्या या २६ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वर्ग क आणि ड कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहेत. यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हास्तरावरील कर्मचार्‍यांच्या बदल्या १७ ते २३ मे दरम्यान होणार आहेत. तर तालुकास्तरावरील कर्मचार्‍यांच्या बदल्या या २६ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या लांब आहेत. मात्र, १६ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशीच प्रत्यक्षात समुपदेशनाने बदल्याची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांची तयारी सुरू केली होती. यात विनंती बदली, सेवा ज्येष्ठते नुसार बदलीपात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात येत होती. जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, नर्स यांची संख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक संवर्ग मोठा आहे. उर्वरित विभागात बदली पात्र कर्मचार्‍यांची संख्या कमी असते. गेल्या काही वर्षापासून नगर जिल्हा परिषदेत ऑनलाईन पध्दतीने बदल्या होत आहेत. यंदाही तशीच पध्दत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावरील बदल्या १७ ते २३ मे या पाच दिवसांच्या कालावधीत उरकाव्या लागणार आहेत. तर तालुकास्तरावरील बदल्या २६ ते ३१ मे या कालावधीत पार पडणार आहेत.