साई सूर्य नेत्रसेवाचा ३६वा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:26+5:302021-08-19T04:25:26+5:30

या कार्यक्रमास साई सूर्य नेत्रसेवाचे संचालक डॉ.प्रकाश व डॉ.सुधा कांकरिया, रोटरीचे उपप्रांतपाल दादासाहेब करंजुले, सचिव पुरुषोत्तम जाधव, महावीर इंटरनॅशनलचे ...

Celebrating the 36th Anniversary of Sai Surya Eye Service | साई सूर्य नेत्रसेवाचा ३६वा वर्धापन दिन साजरा

साई सूर्य नेत्रसेवाचा ३६वा वर्धापन दिन साजरा

या कार्यक्रमास साई सूर्य नेत्रसेवाचे संचालक डॉ.प्रकाश व डॉ.सुधा कांकरिया, रोटरीचे उपप्रांतपाल दादासाहेब करंजुले, सचिव पुरुषोत्तम जाधव, महावीर इंटरनॅशनलचे बाबुशेठ लोढा, रमेश बाफना, मराठवाडा मित्रमंडळाचे सदाशिव मोहिते, उमाकांत जांभळे उपस्थित होते. यावेळी आपटे म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्य दिन व साई सूर्य नेत्रसेवाचा वर्धापन दिन एकाच दिवशी आहे, हा सुवर्णयोग आहे. साई सूर्य नेत्रसेवाने दृष्टीच्या क्षेत्रात मौलिक कार्य केले आहे. युवकांना चष्माविना निर्दोष व निरोगी दृष्टी मिळवून दिली आहे. देश उभारणीच्या कार्यात साई सूर्य नेत्रसेवाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. डॉ.कांकरिया यांच्या मातोश्री मानकुंवरबाई व मी अशा दोघींनी देश लढ्यात झोकून देऊन कार्य केले. दोघींनीही एकाच वेळेस कारावास भोगला. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

महापौर रोहिणी शेंडगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कमलताई आपटे यांचा सत्कार डॉ.सुधा कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर शेंडगे म्हणाल्या, साईसूर्य नेत्रसेवाने अनेक उत्तम कार्य करून देशामध्ये नावलौकिक मिळविला आहे.

डॉ.सुधा कांकरिया यांनी प्रास्ताविक केले. साई सूर्य नेत्रसेवाचा धावता प्रवास सांगितला. डॉ.प्रकाश कांकरिया यांनी शिबिराची माहिती सांगितली. कोरोनाविषयीचे सर्व प्रकारचे नियम पाळून सध्याचे शिबिर टप्प्याटप्प्याने घेण्यात येत आहे. त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

---

फोटो- १६ साईसूर्या

साईसूर्या नेत्रसेवाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिबिराचे उदघाटन करताना कमलताई आपटे. समवेत महापौर रोहिणी शेंडगे, डॉ.सुधा व डॉ.प्रकाश कांकरिया आदी.

Web Title: Celebrating the 36th Anniversary of Sai Surya Eye Service