शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST

पाच जणांच्या टोळीतील चौघांना पोलिसांनी पकडले असून एक जण पळून गेला. त्यांच्याकडील मोबाइल, दोन दुचाकी वाहने व दरोड्याचे साहित्य ...

पाच जणांच्या टोळीतील चौघांना पोलिसांनी पकडले असून एक जण पळून गेला. त्यांच्याकडील मोबाइल, दोन दुचाकी वाहने व दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.

जालिंदर मच्छिंद्र बर्डे (वय ३०), गणेश मच्छिंद्र गायकवाड उर्फ अजय (वय २३) (दोघेही रा. गुहा, ता. राहुरी), लखन अर्जुन पिंपळे (वय ३०, रा. दोडरवीरनगर, ता. सिन्नर, जिल्हा. नाशिक), सोमनाथ अर्जुन पवार (वय २१, रा. बाजार वाकडी, ता. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची तर अशोक हरिभाऊ बनवटे (रा. श्रीरामपूर, मूळ. रा. कोतूळ, ता. अकोले) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. त्यांच्याविरोधात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर दत्तात्रय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे पोलीस पथकासह गस्तीवर असताना त्यांना अकोलेकडे जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलाखाली अंधारात चार ते पाच जण संशयितरित्या उभे असल्याचे दिसले. पोलीस येत असल्याचे पाहून त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली. दरोड्याच्या तयारीतील सर्वजण पळून जात असताना त्यातील चार जणांना पाठलाग करून पकडले. तर बनवटे हा पळून गेला.

त्यांच्याकडील सॅकमधून दगडे, मिरची पूड, मोबाइल फोन, दरोड्याचे इतर साहित्य तसेच दोन दुचाकी वाहने (एमएच १७- एडी ७३५४, एमएच १२-सीडब्ल्यू ४२९२) पोलिसांनी जप्त केली. पोलीस निरीक्षक देशमुख यांसह पोलीस हेड कॉस्टेबल अमित महाजन, पोलीस नाईक विजय खाडे, पोलीस शिपाई सचिन उगले, अविनाश बर्डे, ज्ञानेश्वर सोनवणे, सुरेश मोरे आदींचा या कारवाईत समावेश होता.