श्रीगोंदा येथे साईसेवा मल्टीस्टेटची शाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:12+5:302021-09-08T04:26:12+5:30

यावेळी समाधान महाराज शर्मा म्हणाले की, साईसेवा परिवाराने अध्यात्मिक विचारातून बचतगट सुरू केले. या बचतगटाच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीत पाऊल ...

Branch of Saiseva Multistate at Shrigonda | श्रीगोंदा येथे साईसेवा मल्टीस्टेटची शाखा

श्रीगोंदा येथे साईसेवा मल्टीस्टेटची शाखा

यावेळी समाधान महाराज शर्मा म्हणाले की, साईसेवा परिवाराने अध्यात्मिक विचारातून बचतगट सुरू केले. या बचतगटाच्या माध्यमातून पतसंस्था चळवळीत पाऊल टाकले आणि ठेवीत कोटीचे शतक पार केले आहे. ही अभिमान व विश्वासाची बाब आहे. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाचपुते यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम मोरे व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाला आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, जिल्हा बॅंकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्षा मनीषा लांडे, अनिलराव पाचपुते, दीपक भोसले, हरिदास शिर्के, अरुणराव पाचपुते, राकेश पाचपुते, अशोक खेंडके, बापूराव गोरे, प्रशांत गोरे, सुरेश भंडारी, सतीश मखरे यांनी भेटी दिल्या. आभार संस्थेचे मुख्य सचिव गणेश डोईफोडे यांनी मानले.

वा.प्र.

Web Title: Branch of Saiseva Multistate at Shrigonda