शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा खून, पित्याचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: June 5, 2014 00:07 IST

अहमदनगर : तालुक्यातील नारायणडोह परिसरात पत्नीवर घेतलेल्या चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या लहान मुलाचा गळा आवळून खून केला, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत तलावात फेकून

अहमदनगर : तालुक्यातील नारायणडोह परिसरात पत्नीवर घेतलेल्या चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या लहान मुलाचा गळा आवळून खून केला, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत तलावात फेकून दिल्याची घटना ८ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणातील आरोपी मुलाचा पिता रतीलाल सोन्याबापू पवार याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. रतीलाल पवार याने झालेले मूल स्वत:चे नाही, अशा संशय घेऊन पत्नी सुनीता हिला माहेराहून ( पाराडी, ता. आष्टी) येथून नारायणडोह येथे आणले. मुलावर औषधोपचार करण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीला समजावून तलावाजवळ आणले. रतिलाल याने पत्नीला मारहाण करून तिच्या हातातील मूल हिसकावून घेतले. मुलाचा गळा आवळून जीवे मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेतास नॉयलॉन दोरी, तार आणि दगड बांधून तलावात फेकून दिले. आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याने न्यायालयात शरण येणे व जमीन मिळण्याबाबत अर्ज केला आहे. सदर अर्ज जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी फेटाळला आहे. आरोपी व मृत बालकाच्या डीएनए चाचणीसाठी, आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करण्यासाठी आरोपीला कोठडी मिळणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. रमेश जगताप यांनी केला. तसेच आरोपीचा जामीन नाकारण्यात यावा, हा सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पवार याचा जमीन अर्ज फेटाळला.