शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बोरा-चोपडांमध्ये लढत

By admin | Updated: May 22, 2016 00:17 IST

अहमदनगर : अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नगर येथील अशोक उर्फ बाबुशेठ बोरा आणि नाशिक येथील मोहनलाल चोपडा यांच्यात थेट लढत होत आहे.

अहमदनगर : अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स (नवी दिल्ली) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नगर येथील अशोक उर्फ बाबुशेठ बोरा आणि नाशिक येथील मोहनलाल चोपडा यांच्यात थेट लढत होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष, प्रांताध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य अशा एकूण २६ जागांसाठी ५३ उमेदवार मैदानात असून रविवारी नगर येथीस बडीसाजन ओसवाल मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे.राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे़ नगर आणि नाशिक अशा दोन केंद्रावर मतदान होणार आहे. नगर येथे बडीसाजन ओसवाल मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल घोषित होणार आहे. नगर येथील मतदान केंद्रावर राज्यातील १८ जिल्ह्यातून ८ हजार ५६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती प्रांतीय निवडणूक अधिकारी अ‍ॅड. डी. डी. खाबिया आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण भंडारी यांनी ‘लोकमत’ला दिली.जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अशोक उर्फ बाबुशेठ सिमरतमल बोरा (नगर) आणि मोहनलाल चोपडा (नाशिक) यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २४ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी अशोक बोरा यांच्या नेतृत्त्वाखाली परिवर्तन पॅनल, तर मोहनलाल चोपडा यांच्या नेतृत्त्वाखाली जय जिनेंद्र ग्रुप निवडणूक लढवित आहे. अठरा जिल्ह्यातून मतदार येणार असल्याने मतदान केंद्रावर मोठी गर्दी होणार आहे़ अखिल जैन समाजाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे़(प्रतिनिधी)प्रांतीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नगरचे लोढाप्रांतीय अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी सतीश नारायणदास लोढा (नगर) आणि सुभाष बाबुलाल घिया जैन (नाशिक) यांच्यात लढत होत आहे.बोरा यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये कार्यकारिणी सदस्यासाठी नगरचे अजय बोरा,पियुष लुकंड, अनिल कटारिया, धनराज संचेती, नंदलाल कोठारी, सुनील बाफना यांचा समावेश आहे.चोपडा यांच्या जय जिनेंद्र पॅनलमध्ये नगर येथील चंदनमल डोशी (संगमनेर), सतीश चोपडा, मनोज सेठिया, सुभाष पगारिया, वैभव नहार (नेवासा) यांचा समावेश आहे.