शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर कासारमधील सराफाचा भातकूडगावमध्ये पुरला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST

शेवगाव/भातकूडगाव : शिरूर कासार (जि.बीड) येथील एका सराफ व्यावसायिकाचा खून करून भातकूडगाव (ता. शेवगाव) येथील शेतात पुरलेला मृतदेह पोलिसांनी ...

शेवगाव/भातकूडगाव : शिरूर कासार (जि.बीड) येथील एका सराफ व्यावसायिकाचा खून करून भातकूडगाव (ता. शेवगाव) येथील शेतात पुरलेला मृतदेह पोलिसांनी रविवारी (दि.२३) सकाळी उकरून बाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

विशाल सुभाष कुलथे (वय २४, रा. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या सराफाचे नाव आहे.

भातकूडगाव येथील रहिवासी असलेला ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचे शिरूर कासार हे मामाचे गाव आहे. त्याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमध्येच त्याचे लग्न झाले आहे. बायकोसाठी सोन्याचे दागिने बनविण्याची ऑर्डर त्याने विशाल कुलथे यांना दिली होती. त्यानुसार तयार झालेले दागिने दाखविण्यासाठी ज्ञानेश्वर याने कुलथे यांना २० मे रोजी सलूनच्या दुकानात बोलाविले होते. तिथे कुलथे यांचा ज्ञानेश्वरने इतर साथीदारांच्या मदतीने खून करून मूळगावी भातकूडगाव येथील चुलत्याच्या शेतात मृतदेह आणून पुरला होता, असे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी सांगितले.

२० मे रोजी शिरूर कासार येथील सराफ विशाल कुलथे यांचे सायंकाळी सहाच्या सुमारास सोन्याचे दागिने दाखविण्याच्या बहाण्याने अपहरण करण्यात आल्याबाबतची तक्रार शिरूर कासार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये दोन युवक कुलथे यांना दुचाकीवरून घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. त्यांच्यातील एक जण केतन संतोष लोमटे (रा. भातकूडगाव, ता. शेवगाव) हा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर साथीदारांची नावे तसेच कुलथे यांचा मृतदेह कुठे पुरला, याचा ठावठिकाणा सांगितला, असे माने यांनी सांगितले.

याप्रकरणी केतन लोमटे याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचा पोलीस शोध घेत आहेत.

230521\img-20210523-wa0022.jpg

?????? ??????????? ????????? ????????? ??? ???????? ???????? ?????? ??????? ??????? ????? ??????? ????? ???????? ? ??????? ???? ??? ???????.