नेवासा शहरात आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST2021-07-13T04:06:31+5:302021-07-13T04:06:31+5:30

नेवासा : ‘लोकमत’ व नेवासा शहरातील गोल्डन ग्रुप, नामदार शंकरराव गडाख मित्रमंडळ, रघुजन गॅस सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा ...

Blood donation camp today in the city of Nevasa | नेवासा शहरात आज रक्तदान शिबिर

नेवासा शहरात आज रक्तदान शिबिर

नेवासा : ‘लोकमत’ व नेवासा शहरातील गोल्डन ग्रुप, नामदार शंकरराव गडाख मित्रमंडळ, रघुजन गॅस सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा शहरात मंगळवारी (दि.१३) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत नेवासा शहरातील पंचायत समिती कार्यालयाशेजारी महेश मापारी यांच्या ऑफिससमोर या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचे उद्घाटन युवानेते उदयन गडाख, इंदिराबाई मुरलीधर बोरकर, नूतन सुरेश जेधे यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरासाठी गोल्डन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनील धायजे, अध्यक्ष सुधीर बोरकर, महेश मापारी, मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक सुनील जाधव, रघुजन गॅसचे संचालक डॉ. लक्ष्मणराव इंगळे, नामदार शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. या रक्तदान शिबिरात शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Blood donation camp today in the city of Nevasa