शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST

कोविड रुग्णांचा सीटी स्कॅन स्कोअर जास्त असेल तर डॉक्टर रेमडेसिविर इंजेक्शन सुरू करतात. मात्र, या इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्हा ...

कोविड रुग्णांचा सीटी स्कॅन स्कोअर जास्त असेल तर डॉक्टर रेमडेसिविर इंजेक्शन सुरू करतात. मात्र, या इंजेक्शनचा तुटवडा आहे. जिल्हा प्रशासनाने ही इंजेक्शन आता केवळ कोविड सेंटरमध्ये मिळतील असे धोरण जाहीर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या हॉस्पिलमध्येही ही इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी करत आहोत. मात्र, इंजेक्शन मिळत नाही, असे अनेक हॉस्पिटल्सचे म्हणणे आहे.

रुग्णांना बाहेर मेडिकल शॉपमध्येही इंजेक्शन मिळायला तयार नाही. या सर्व बाबींचा गैरफायदा काळाबाजार करणारे घेत आहेत. १० ते २० हजार रुपयांपर्यंत एक इंजेक्शन विकले जात आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईकही काळ्या बाजारातून नाइलाजाने इंजेक्शन खरेदी करत आहेत.

.......................

प्रशासनाकडून तपासणीच नाही

प्रशासनाने तातडीने यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या रेमडेसिविरचा साठा तपासल्यास काळाबाजार करणारे तातडीने शोधले जाऊ शकतात. मात्र, प्रशासन यापूर्वी वाटप झालेला साठाच तपासायला तयार नाही. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे फावले आहे. यात गरीब रुग्णांचे हाल होत असून त्यांना कोठेच इंजेक्शन मिळायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे.

.........

नागरिकांनी तक्रारी करणे आवश्यक

काळाबाजार करणाऱ्यांविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्यास असे लोक गजाआड होऊ शकतात. मात्र, याबाबत नागरिकांनी पुराव्यांनिशी तक्रार करणे आवश्यक आहे. नागरिकांनी केलेल्या अशा तक्रारींमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतात.