भाजप पदाधिकाऱ्यांचा देवटाकळीत सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:00+5:302021-07-31T04:22:00+5:30

दहीगावने : शेवगाव तालुक्याची भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी तालुकाध्यक्ष सचिन वारकड यांनी नुकतीच जाहीर केली. या कार्यकारिणीत दहीगावने गटातील ...

BJP office bearers honored in Devtakali | भाजप पदाधिकाऱ्यांचा देवटाकळीत सन्मान

भाजप पदाधिकाऱ्यांचा देवटाकळीत सन्मान

दहीगावने : शेवगाव तालुक्याची भाजप युवा मोर्चाची कार्यकारिणी तालुकाध्यक्ष सचिन वारकड यांनी नुकतीच जाहीर केली. या कार्यकारिणीत दहीगावने गटातील तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळाली. यामध्ये सरचिटणीसपदी लक्ष्मण काशीद (दहीगावने) व सदस्यपदी अप्पासाहेब सुकाशे (मठाचीवाडी) यांची निवड झाली, तसेच भातकुडगाव गटातील नारायण काळे (देवटाकळी) व चिटणीसपदी गणेश सामृत (बक्तरपूर) यांचीही निवड झाली. या पदाधिकाऱ्यांचा देवटाकळी येथे बुधवारी सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, कल्याण जगदाळे, सुरेश बडे, महादेव पवार, योगेश साबळे, कैलास जाधव, संदीप खरड, मनोज काळे, दत्तात्रय घानमोडे, दत्तात्रय जगताप, बाबासाहेब दळे, प्रशांत खरड, शंकर चिकणे, श्रीधर खरड, देवीदास शिरसाठ, मुसाभाई शेख, अविनाश खरड, दीपक ओंबळे, अमोल खरड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, देवटाकळी येथील ६५ व्या वर्षी कळसुबाई शिखर सर करणारे कृष्णनाथ दादाबा खरड, ग्रामीण भागात केजी ते बारावीपर्यंत इंग्रजी शाळेला मान्यता मिळविलेल्या लिट्ल स्टार शाळेचे संचालक साबळे बंधूंचाही सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक संदीप खरड यांनी केले. सुरेश बडे यांनी आभार मानले. (वा.प्र.)

---

३० देवटाकळी बीजेपी

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकारिणीत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा देवटाकळी येथे सन्मान करण्यात आला.

Web Title: BJP office bearers honored in Devtakali