१८ वर्षांखालील मुलांना आता दर महिन्याला ११०० रुपये मिळणार आहेत. एका कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळत असून, बालकल्याण समिती न्यायालयाने या सर्व कुटुंबांना अहमदनगरला यावे लागू नये म्हणून स्वतः अकोल्यात येण्याचा निर्णय घेतला. एकाच दिवशी सर्व ४७१ प्रस्ताव मंजूर करून या गरीब महिलांचा त्रास वाचवला. या समितीत बालकल्याण समिती अध्यक्ष हनिफ शेख, समिती सदस्य बागेश्री जरंडीकर, बाल संरक्षण कक्षाचे सर्जेराव शिरसाठ, प्रशांत गायकवाड, प्रशांत वाघ, श्रद्धा अंधारे व रूपाली वाव्हळ यांचा समावेश होता. तालुका विधवा पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी या शिबिराची माहिती गावोगावी पोहोचवून अपेक्षित कागदपत्रे सांगितली. हे फॉर्म अगोदरच उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे हे फॉर्म, कागदपत्रे असे संच अनेकांनी तयार करून आणले. नोंदणीपासून ते रांगा करण्यापर्यंत सर्व कामे कार्यकर्त्यांनी केल्यामुळे हे काम लवकर पूर्ण झाले.
संध्याकाळी सातपर्यंत समितीने सलग काम करून प्रस्ताव मंजूर केले. या योजनेत दोन मुलांना दर महिन्याला २२०० रुपये मिळणार असल्याने या मुलांच्या शिक्षणाला नक्कीच हातभार लागेल, अशी भावना अनेक विधवा भगिनींनी व्यक्त केली. यासोबतच या महिलांना संजय गांधी निराधार योजना मंजूर करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. कोरोना विधवांची एकाच दिवशी २४ प्रकरणे तहसीलदार यांनी मंजूर केली होती. नगरला जावे लागत असल्यामुळे अनेक महिलांनी हे प्रस्ताव केले नव्हते. परंतु समितीने प्रत्यक्ष अकोल्यात येण्याचा निर्णय घेतल्यामुळे या महिलांची सोय झाली. महिला व मुले अशा १५०० व्यक्तींचा भाडे खर्च वाचला आहे.
..............
यांनी घेतले परिश्रम
हेरंब कुलकर्णी, रोहिणी कोळपकर, संगीता साळवे, प्रतिमा कुलकर्णी, बाळासाहेब साळवे, शिवाजी नेहे, सुभान शेख, नवनाथ नेहे, नीलेश तळेकर, मनोज गायकवाड, योगेश तळेकर यांनी परिश्रम घेतले.