शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठाने फेटाळला छिंदम बंधूंचा अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST

अहमदनगर : महापालिकेतील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदमचा जबरी चोरी व ॲट्रॉसिटीचे गुन्ह्यात औरंगाबाद खंडपीठाने ...

अहमदनगर : महापालिकेतील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदमचा जबरी चोरी व ॲट्रॉसिटीचे गुन्ह्यात औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर ३० ते ४० जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दिल्ली गेट येथील टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दाखल केली होती. छिंदम बंधूंसह त्यांच्या साथीदारांनी ९ जुलै रोजी दुपारी दिल्ली गेट येथे बोडखे यांना जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या ज्युस सेंटरमधील साहित्य फेकून दिले. यावेळी श्रीपाद छिंदम याने टपरीच्या गल्ल्यातील ३० हजार रुपये हिसकावून बोडखे व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी बोडखे व त्यांच्या मुलास तेथून हुसकावून देत त्यांची टपरी जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकली, असे फिर्यादीत म्हटले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर छिंदम सह चौघांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होते. येथे मात्र त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर चौघांनी खंडपीठात धाव घेतली होती. येथे महेश सब्बन व राजेंद्र जमधाडे यांना अटकपूर्व जामीन मिळाला मात्र श्रीपाद व श्रीकांत छिंदम यांचा अर्ज फेटाळून लावला. फिर्यादीच्या वतीने खंडपीठात ॲड. विजय पी. लटंगे यांनी काम पाहिले.