बाधित रुग्ण घरातच असल्याने बेड शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST2021-04-05T04:18:13+5:302021-04-05T04:18:13+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या डॉशबोर्डवर सध्या तरी ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड उपलब्ध आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तरी बेड ...

बाधित रुग्ण घरातच असल्याने बेड शिल्लक
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या डॉशबोर्डवर सध्या तरी ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड उपलब्ध आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तरी बेड मिळत नाहीत, अशी कुठेही स्थिती नाही. जिल्ह्यात तब्बल ८७ कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. त्यापैकी २५ कोविड केअर सेंटरमध्ये मोफत सुविधा आहेत, तर डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) असलेल्या खासगी रुग्णालयात सशुल्क सेवा आहे. दोन्ही ठिकाणी सध्या तरी पुरेसे बेड उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल ९ हजारांच्यावर गेली आहे. मात्र त्यातील निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. होम आयसोलेशन बंद केलेले असले तरी आठ दिवसांपूर्वी जे रुग्ण बाधित आढळून आले होते, ते सर्व रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेन्टीलेटर बेडची पुरेशी उपलब्धता सध्या तरी दिसते आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद अशा शहरांमध्ये बेड मिळणे कठीण झालेेले आहे. मात्र अहमदनगरमध्ये सध्या तरी तशी परिस्थिती ओढवली नसल्याचे आरोग्य यंत्रणा सांगत आहे.
-----------------
अशी आहे बेडची सुविधा
बेड प्रकार एकूण बेड उपलब्ध बेड
नॉर्मल बेड ८८३९ ५२१९
आयसीयू बेड ६८८ २१७
ऑक्सिजन बेड १७१८ ५५२
-----------------------
जिल्ह्यातील मोफत कोविड सेंटर
१) गुरू अर्जुनदेव नटराज हॉटेल, नगर
२) बास्को ग्रामीण, नगर
३) जैन पितळे बोर्डिंग, नगर
४) नवजीवन वसतिगृह, माळी बाभुळगाव
५) नर्सिंग होस्टेल, तिसगाव
६) काकडे वसतिगृह, पाथर्डी
७) मोहटादेवी भक्त निवास, मोहटा
८) सीआरएचपी न्यू बिल्डिंग, जामखेड
९) भक्त निवास, पिंपळगाव रोठा, ता. पारनेर
१०) झेड. पी. स्कूल, घारगाव, संगमनेर
११) ग्रामीण रुग्णालय, वांबोरी
१२) आदिवासी शासकीय वसतिगृह, घुलेवाडी, संगमनेर
१३) महात्मा गांधी विद्यालय वसतिगृह, कर्जत
१४) संत नागेबाबा भक्त निवास, भेंडा, ता. नेवासा
१५) शासकीय आश्रमशाळा, बुऱ्हाणनगर
१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, शेवगाव
१७) मानची हिल आयुर्वेद कॉलेज, संगमनेर
१८) ग्रामीण रुग्णालय, नेवासा
१९) प्रवरा, ग्रामीण रुग्णालय, लोणी
२०) आनंद लॉन, अहमदनगर
२१) कोविड केअर सेंटर, कुरण, ता. संगमनेर
२२) मौलाना आझाद कम्युनिटी सेंटर, संगमनेर
२३) ट्रामा केअर युनिच, घुलेवाडी
२४) केनडी हॉल हॉस्पिटल, संगमनेर
२५) जि.प. प्रा. शाळा, निमोण, ता. संगमनेर