दोन टेम्पोंची धडक; एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST2021-09-27T04:23:00+5:302021-09-27T04:23:00+5:30

टाकळी ढोकेश्वरी : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ढोकेश्वरी (ता. पारनेर) शिवारात झालेल्या टेम्पो अपघातामध्ये एक ठार तर अन्य दोन ...

Beating of two tempos; One killed, one injured | दोन टेम्पोंची धडक; एक ठार, एक जखमी

दोन टेम्पोंची धडक; एक ठार, एक जखमी

टाकळी ढोकेश्वरी : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ढोकेश्वरी (ता. पारनेर) शिवारात झालेल्या टेम्पो अपघातामध्ये एक ठार तर अन्य दोन जखमी झाले.

याबाबतची फिर्याद काशिनाथ सखाराम इले यांनी टाकळी ढोकेश्वरी पोलिसात दिली आहे. टाकळी ढोकेश्वरी येथील नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि.२६) पहाटे ४:३० च्या दरम्यान टाकळी ढोकेश्वरीपासून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण १ किलोमीटर अंतरावर दोन टेम्पोची धडक झाली. यामध्ये टेम्पो (क्र. एम. एच.२१ बी. एच. ८५३५) वरील क्लीनर डोक्याला गंभीर मार लागल्याने सोमीनाथ भाऊसाहेब सादरे (वय २१, रा. गाडे जळगाव, ता. जि. औरंगाबाद) हा जागीच ठार झाला. चालक दिनेश गणेश गोल्डे (रा. रेवगाव, ता. जि. जालना) याचे अपघातामध्ये दोन्ही पाय तुटले असून गंभीर जखमी झाला आहे.

दुसरा टेम्पो (क्र. एम. एच. १६ सी. सी. ८०४७) वरील क्लीनर सोमनाथ केदार व चालक दत्तात्रेय गीताराम वावरे (रा. शिक्री, वासुंदे, ता. पारनेर) हे जखमी झाले आहेत. चालक दत्तात्रेय गीताराम वावरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी कडूस करीत आहेत.

Web Title: Beating of two tempos; One killed, one injured